Narendra Modi: "दीड खोल्यांचं घर अन् आईचे कष्ट", वाचकाला भावनिक करणारा मोदींचा ब्लॉग 'माँ'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:47 PM2022-06-18T13:47:59+5:302022-06-18T13:48:43+5:30
'आई हा केवळ शब्द नाही, जीवनातील ती भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास यांसह अनेक गोष्टी सामावल्या आहेत.
अहमदाबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रीं समवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तर, मोदींनी मां या नावाने भलामोठा ब्लॉग लिहून बालपणीच्या आठवणी आणि आईने घेतलेले कष्ट, दिलेले संस्कार लेखातून सांगितले आहेत.
'आई हा केवळ शब्द नाही, जीवनातील ती भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास यांसह अनेक गोष्टी सामावल्या आहेत. माझी आई हरिबा आज 18 रोजी 100 व्या वर्षात प्रवेश करत आहे. तिचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळेच, मी माझा आनंद आणि नशिबवान असल्याचं सुख आपल्यासोबत शेअर करत आहे,' असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे. मोदींनी भलामोठा ब्लॉग लिहला असून या ब्लॉगच्या माध्यमातून आईची संघर्षगाथाच सांगितली आहे.
मोदींच्या आजीचं म्हणजेच हिराबा यांच्या आईचं त्यांच्या लहानपणीच निधन झालं. त्यामुळे, आईचं प्रेम, लाड आणि मायेची सावली हिराबा यांना मिळालीच नसल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच, लहानपणापासूनच किती कष्ट आईने सहन केले, याची संघर्षकहानीच मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितली आहे. तसेच, आईसमवेतचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. ज्यामध्ये, मोदींचा काही जीवनप्रवासही उलगडला आहे.
मां, ये सिर्फ एक शब्द नहीं है, जीवन की वो भावना है, जिसमें स्नेह, धैर्य, विश्वास, कितना कुछ समाया है।
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
मेरी मां, हीराबा आज 18 जून को अपने सौवें वर्ष में प्रवेश कर रही हैं, उनका जन्म शताब्दी वर्ष प्रारंभ हो रहा है। मैं अपनी खुशी और सौभाग्य साझा कर रहा हूं। https://t.co/4YHk1a59RD
पावसाळ्यात आमचं घर कधी इकडून टिपकत, तर कधी तिकडून टिपकत असे. संपूर्ण घरात पाणी साठू नये, घराच्या मातीच्या भिंती नीट राहाव्यात यासाठी आई घरात पाणी ठिपकत असेल तेथे भांडे ठेवत. तेच पाणी वापरासाठी आई 2-3 दिवस वापरत असे. जलसंरक्षणाचं यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण काय असू शकेल, अशी बालपणीची आठवण सांगत मोदींनी आईच्या शिकवणी आणि संस्कारांची शिदोरी सोबत घेऊनच आपण पुढे वाटचाल केल्याचं त्यांनी मां या ब्लॉगमधून सांगितलं. या ब्लॉगमधून मोदींनी आईंची जीवनकहानी सांगत अनेक प्रसंग आणि घटना कथन केल्या आहेत. मोदींचा मां हा ब्लॉग अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी आहे.