Narendra Modi : 1 कोटी 50 हजारांना विकलेल्या नीरजच्या भाल्याची मूळ किंमत किती? जाणून घ्या रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 03:55 PM2021-10-08T15:55:20+5:302021-10-08T15:55:49+5:30

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याने सर्वाधिक किंमत मिळवली.

Narendra Modi : This is the original price of Neeraj Chopra's spear sold for Rs 1 crore 50 thousand in auction by PM narendra modi | Narendra Modi : 1 कोटी 50 हजारांना विकलेल्या नीरजच्या भाल्याची मूळ किंमत किती? जाणून घ्या रक्कम

Narendra Modi : 1 कोटी 50 हजारांना विकलेल्या नीरजच्या भाल्याची मूळ किंमत किती? जाणून घ्या रक्कम

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याने सर्वाधिक किंमत मिळवली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृती चिन्हांचा लिलाव 7 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. या लिलावात टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक किंमत मिळाली. या भाल्यासाठी सर्वाधिक १ कोटी ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ऐतिहासिक व धार्मिक महत्वाच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. तसेच ऑलिम्पिक खेळा़डूंच्या वस्तूंनाही चांगली मागणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशविदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याने सर्वाधिक किंमत मिळवली. वास्तविक या भाल्याची मूळ किंमत ऑनलाईन स्टोअरमध्ये 80 हजार रुपये एवढी आहे. मात्र, नीरज चोप्राच्या सहीचा, ऐतिहासिक सुवर्णपदकाचा हा भाला साक्षीदार आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूमधील एक आहे. त्यामुळे, या 80 हजारांच्या भाल्याला 1 कोटी 50 हजार रुपयांची बोली लागली. 

10 कोटींची बोली बनावट

टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याने ज्या भाल्याच्या साहाय्याने सुवर्णपदक जिंकले, त्या भाल्यावर त्याने आपली स्वाक्षरी केली व तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिला होता. नीरज चोप्राच्या भाल्याला १० कोटी रुपयांची बोली ४ ऑक्टोबर रोजी लावण्यात आली होती. मात्र ही बोली बनावट असल्याचा संशय आल्याने ती रद्द करण्यात आली.

लिलावाची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला

पॅरालिम्पिकमध्ये भारताचा सुवर्णपदक विजेता खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्याची लिलावात मूळ बोली १ कोटी रुपयांची होती. आता या रकमेत वाढ होऊन ती १ कोटी २० हजार रुपये झाली आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावण्याची मुदत गुरुवारी संध्याकाळी संपली. या लिलावाला १७ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येईल.

राममंदिराच्या प्रतिकृतीसाठी २४ बोली

अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिराची लाकडी प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात आली होती. या प्रतिकृतीची मूळ बोली अडीच लाख रुपये ठरविण्यात आली. धार्मिकदृष्ट्या महत्व राखून असलेली ही प्रतिकृती विकत घेण्यासाठी आतापर्यंत २४ बोली लागल्या आहेत. धातूच्या गदेची मूळ बोली अडीच हजार रुपये असली तरी तिच्यासाठी ५४ बोली लागल्या. या गदेची सर्वाधिक बोली आता ५ लाख रुपयांची आहे.
 

Web Title: Narendra Modi : This is the original price of Neeraj Chopra's spear sold for Rs 1 crore 50 thousand in auction by PM narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.