156 ग्रॅम सोन्याने बनवला PM मोदींचा पुतळा, नेटकरी म्हणाले, पंतप्रधानांची लोकप्रियता अमिताभ-रजनीकांतपेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:25 AM2023-01-14T11:25:41+5:302023-01-14T11:26:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती सध्या चर्चेत आहे. बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात एका कलाकाराने नरेंद्र मोदी यांची ११५६ ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती सध्या चर्चेत आहे. बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात एका कलाकाराने नरेंद्र मोदी यांची ११५६ ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. या सोन्याच्या मूर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बे गोल्ड प्रदर्शनातला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोन्याच्या मूर्तीचा व्हिडीओ आहेत. पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती गोल फिरताना यामध्ये दिसतेय. मूर्तीचे वजन १५६ ग्रॅम असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच इतक्या कमी वजनाच्या सोन्यापासून मूर्ती तयार करणं हे कलाकाराचं कसब असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
याआधी धनत्रयोदशीला इंदौरमध्ये एका सोनाराच्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती विकण्यात आल्या होत्या. मुंबईतील सोनाराने ऑर्डर देऊन या मूर्ती तयार केल्या होत्या. १५० ग्रॅम चांदीच्या त्या मूर्ती ११ हजार रुपयांमध्ये विकल्या गेल्या होत्या. यात मोदींच्या वेगवेगळ्या वेशभुषा दाखवल्या होत्या.
इंदौरमध्येच निर्मल वर्मा हे बऱ्याच काळापासून PM मोदींची चांदीची नाणी, नोटा यांची विकतात. जेव्हा त्यांनी एका ग्रुपवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्या तेव्हा स्पेशल ऑर्डर देऊन त्यांनी मूर्ती तयार करून घेतल्या.