Narendra Modi in Punjab: पंतप्रधानांचा ताफा अडवला तेव्हा सीएम चन्नींनी फोन उचलला नाही, नड्डांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:10 PM2022-01-05T18:10:42+5:302022-01-05T18:10:52+5:30
Narendra Modi in Punjab: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंबाजचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
फिरोजपूर- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठे बळ पंजाब-हरियाणातून मिळाले होते. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर होते. पण, बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांनी ट्विट करुन दावा केला आहे की, जेव्हा पीएम मोदींचा ताफा अडकला होता तेव्हा सीएम चन्नी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला होता.
पंजाब के मुख्यमंत्री चन्नी ने फोन पर बात करने या इस मामले का समाधान करने से इनकार कर दिया। पंजाब सरकार द्वारा इस्तेमाल की जाने वाली रणनीति, लोकतांत्रिक सिद्धांतों में विश्वास रखने वाले किसी भी व्यक्ति को कष्ट पहुंचाएगी और उन्हें व्यथित करेगी।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
नड्डांनी एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले. त्यांनी लिहिले, पंजाबमधील आगामी निवडणुकीत मतदारांच्या हातून दारुण पराभवाच्या भीतीने काँग्रेस सरकारने पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. हे करत असताना पीएम मोदींना भगतसिंग आणि इतर हुतात्म्यांना आदरांजली वाहायची आणि विकासकामांची पायाभरणी करायची आहे हेही त्यांना आठवले नाही.
अपनी निकृष्ट सोच और ओछी हरकतों से पंजाब की कांग्रेस सरकार ने दिखा दिया है कि वह विकास विरोधी है और हमारे स्वतंत्रता सेनानियों के लिए भी उनके दिल में कोई सम्मान नहीं है। यह घटना माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी की सुरक्षा में एक बहुत बड़ी चूक थी। यह बेहद चिंताजनक है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
नड्डा पुढे म्हणाले की, पंजाबच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या घृणास्पद कारवाया करून दाखवून दिले आहे की ते विकासविरोधी आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही आदर नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही घटना पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक होती. एसपीजीला पंजाबचे प्रधान सचिव आणि डीजीपी यांनी सांगितले की, पीएम मोदींचा मार्ग मोकळा आहे. तरीही आंदोलकांना तेथे जाण्याची परवानगी देण्यात आली. सर्वात वाईट म्हणजे सीएम चन्नी यांनी फोनवर बोलून प्रकरण सोडवण्यास नकार दिला. पंजाबच्या काँग्रेस सरकारने वापरलेली ही रणनीती लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला खटकेल.