Narendra Modi in Punjab: जिथे नरेंद्र मोदींचा ताफा अडकला, तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:21 PM2022-01-05T20:21:49+5:302022-01-05T20:23:27+5:30

Narendra Modi in Punjab: पंजाबमधील फिरोजपूर जिल्हा अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. पंतप्रधानांचा ताफा अडकला त्या ठिकाणापासून अवघ्या 30 किमी अंतरावर पाकिस्तान आहे. तसेच, या भागात अनेकदा टिफिन बॉम्ब आणि इतर स्फोटके सापडत असतात.

Narendra Modi | Punjab | Pakistan border is just 30 Km away from where PM Narendra Modi's convoy stopped on the highway | Narendra Modi in Punjab: जिथे नरेंद्र मोदींचा ताफा अडकला, तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तान

Narendra Modi in Punjab: जिथे नरेंद्र मोदींचा ताफा अडकला, तिथून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तान

Next

फिरोजपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली. पीएम मोदी एका सभेला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि यामुळे मोदींना 15-20 मिनीटे अडकून राहावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी मोदींचा ताफा अडकला होता, तो अत्यंत असुरक्षित परिसरात आहे. 

30 किमी अंतरावर पाकिस्तान
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील मुडकीजवळ राष्ट्रीय महामार्गावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी त्यांना अडवले. यादरम्यान पंतप्रधानांना जिथे थांबावे लागले ते ठिकाण अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. या ठिकाणापासून अवघ्या 30 किमी अंतरावर पाकिस्तान आहे. तसेच, या भागात अनेकदा टिफिन बॉम्ब आणि इतर स्फोटके सापडत असतात. यावरुन पंजाब पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे.

पठाणकोट स्फोटामुळे पंजाब हाय अलर्टवर
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असल्यामुळे फिरोजपूर हा पंजाबमधील अतिशय संवेदनशील जिल्हा आहे. येथे पंतप्रधानांच्या मेळाव्याची घोषणा दीड आठवड्यापूर्वी करण्यात आली होती. दुसरीकडे लुधियाना आणि पठाणकोटमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण पंजाब हाय अलर्टवर आहे. 15 सप्टेंबर 2021 रोजी ज्या जलालाबाद शहरामध्ये स्फोट झाला होता तेही फिरोजपूरजवळ आहे आणि एनआयएच्या तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याच परिसरात टिफिन बॉम्बची डिलिव्हरी

जलालाबाद बॉम्बस्फोटानंतर एनआयएने टिफिन बॉम्ब पुरवल्याप्रकरणी अटक केलेला गुरुमुखसिंग रोडे हा मोगा जिल्ह्यातील रोडे गावचा रहिवासी असून ते जर्नेलसिंग भिंडरवालाचे जन्मस्थान आहे. भिंडरवाला याचा पुतण्या आणि पाकिस्तानात आश्रय घेतलेला खलिस्तानचा दीर्घकाळ पुरस्कर्ता असलेला लखबीर सिंग रोडेही याच भागातील आहे.

लखबीर सिंग रोडे याने गुरुमुखामार्फत सीमेपलीकडून टिफिन बॉम्ब पोहोचवले होते. फिरोजपूर सेक्टरमध्ये एक-दोन टिफिन बॉम्ब पोहोचवल्याची कबुली गुरुमुखने केंद्रीय यंत्रणांसमोर दिली होती. अशा परिस्थितीत, पंतप्रधानांच्या रॅलीच्या माहितीनंतर पंजाब पोलिसांकडे तयारीसाठी पुरेसा वेळ होता, परंतु त्यांची काउंटर इंटेलिजन्स विभाग आणि इतर गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली.

सकाळी सर्वकाही ठीक होते, पण...

पंजाब सरकारचा दावा आहे की, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 10,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पंजाब पोलिसांनी बुधवारी सकाळी भटिंडा-फिरोजपूर चार लेनचीही तपासणी केली. सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत महामार्गावर कुठेही अडथळा नव्हता. दुपारी 12 नंतर अचानक परिस्थिती बिघडू लागली आणि शेतकरी संघटनांचे सदस्य आणि उपद्रवी घटक महामार्गावर पोहोचले. यादरम्यान पंजाब पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले.
 

Web Title: Narendra Modi | Punjab | Pakistan border is just 30 Km away from where PM Narendra Modi's convoy stopped on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.