Narendra Modi Punjab : पंजाब पोलिसांकडून शार्प शुटर गोगीसह तिघांना अटक, हँड ग्रेनेटही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 11:07 PM2022-01-07T23:07:17+5:302022-01-07T23:11:04+5:30

Narendra Modi Punjab : पंजाब पोलिसांनी कॅनडात असलेल्या कुख्यात गँगस्टर अर्षदीप सिंह ऊर्फ अर्श डालाच्या शार्प शुटर गुरप्रीत गोगीसह तीन गुडांना अटक केली आहे

Narendra Modi Punjab : Punjab police arrested three persons including sharp shooter Gogi and also seized hand grenades | Narendra Modi Punjab : पंजाब पोलिसांकडून शार्प शुटर गोगीसह तिघांना अटक, हँड ग्रेनेटही जप्त

Narendra Modi Punjab : पंजाब पोलिसांकडून शार्प शुटर गोगीसह तिघांना अटक, हँड ग्रेनेटही जप्त

googlenewsNext

चंडीगढ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत गडबड झाल्याने पंजाब सरकारवर देशभरातून टीका होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पंजाबपोलिसांतील काही अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. त्यातच, पंजाब पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मोदींच्या रॅलीत या गुन्हेगारांकडून, शार्प शुटरकडून घातपात करण्याचा डाव होता का, याबाबत पोलिसांनी स्पष्टपणे नकार दिला आहे.   

पंजाब पोलिसांनी कॅनडात असलेल्या कुख्यात गँगस्टर अर्षदीप सिंह ऊर्फ अर्श डालाच्या शार्प शुटर गुरप्रीत गोगीसह तीन गुडांना अटक केली आहे. या तिघांकडून दोन 9 एम.एम. पिस्तुल, दोन हँड ग्रेनेड आणि 18 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये, गोगी हा तरनतारणच्या प्रदेशातील भिखीविंड घटनेत गतवर्षी अटक करण्यात आलेल्या टिफन बॉम्ब प्रकरणातही नावजलेला होता. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

एसएसपी चरणजीत सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, विदेशातून शस्त्रास्त्रे पुरवली असतील, असा अंदाज आहे. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत गडबड करण्याचा कट रचण्यात आल्याबाबतचे वृत्त सिंग यांनी फेटाळून लावले आहे. मात्र, या तिघांना पंजाबमध्ये धार्मिक स्थळांवर स्फोट घडवून दहशत पसरविण्यासाठी तयार करण्यात येत होते, असे सिंग यांनी म्हटले आहे. त्यातून, काही जणांच्या माध्यमातून शस्त्रांस्त्रांची खेप यांच्याकडे पोहोचल्याचंही सिंग यांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मेहना पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, स्फोटकं आणि शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांची कार नाकाबंदीच्या ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी धाडसी कारवाई करत या तिघांनाही जेरबंद केले.  
 

Web Title: Narendra Modi Punjab : Punjab police arrested three persons including sharp shooter Gogi and also seized hand grenades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.