Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

LIVE

By महेश गलांडे | Published: February 8, 2021 10:30 AM2021-02-08T10:30:43+5:302021-02-08T11:57:28+5:30

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान  नरेंद्र मोदी  आज ...

Narendra Modi in Rajya Sabha Live: Speech on President's address, Narendra Modi will speak on farmers' movement | Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

Next

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

केंद्र सरकार या कायद्यातील बदलाला तयार आहे, पण शेतकरी आंदोलकांच्या मागणीनुसार तिन्ही कायदे रद्द करण्यास सरकार तयार नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आत्तापर्यंत तब्बल 12 वेळा चर्चा झाली आहे, पण अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे, शेतकरी आंदोलन कधी संपुष्टात येईल, हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत असा आहे.   

 

LIVE

Get Latest Updates

02:32 PM

MSP म्हणजे काय रे भाऊ

Farmers Protest : नरेंद्र मोदींनी ज्या MSP बद्दल राज्यसभेत मोठी घोषणा केली, ती MSP म्हणजे काय माहित्येय?

02:31 PM

देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहावं लागेल

Narendra Modi: आंदोलनजीवी टोळीपासून बचाव करा, नवा FDI म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी; पंतप्रधानांचा निशाणा

11:55 AM

गुलाब नबी आझाद यांचं कौतुक

गुलाम नबी आझाद तुम्ही कौतुक केलंत, त्याबद्दल आपले आभार. तुम्ही प्रशंसा केलीत की मला भीती वाटते. आपकी पार्टी वाले इसे उचित स्पीरीट मे लेंगे, 'जी २३' की राय मान कर के उलटा न कर दे, असे मोदींनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. मोदींनी गुलाब नबी आझादच्या यांच्या सभागृहातील सृजनशील वर्तनाचे कौतुक केले. तसेच, जम्मू काश्मीरमधील निवडणुकांचं कौतुक केल्याबद्दल आभारही मानले

11:50 AM

मोदी है मौका लिजिए

सभागृहात चांगली चर्चा झाली, विविध विषयांवर भाषणं झाली. माझ्यावरही टीका झाली, केवढं बोललं गेलं, मी तुमच्या कामी आलो याचा मला आनंद. माझ्यावर राग काढल्यानं तुमचा केवढा राग हलका झाला असेलअसा आनंद घेत राहा, चर्चा करत राहा... मोदी है मौका लिजिए

11:48 AM

मी एकटा नसून 130 कोटी देशवासीयांसमवेत  

वेदांमध्ये एक महान विचार आहे, तो 130 कोटी देशवासीयांसाठी आहे.

आयुतो अहंम, आयुतों मे आत्मा
आयुतं मै चक्ष हूँ, आयुतों मै श्रोतं हूँ

या श्कोलाचा अर्थ सांगताना, माझ्यासोबत कोट्यवधींची दृष्टी, श्रवणशक्ती आणि सर्वशक्ती आहे, असे मोदींनी म्हटले. मी एकटा नाही, मी माझ्यासोबत कोट्यवधी मानवांना बघतो, त्यांना अनुभवतो. त्यामुळे, या कोट्यवधींची श्रवणशक्ती माझ्यात आहे, दृष्टी माझ्यात आहे, ग्रहणशक्ती माझ्यात आहे. या वेदांप्रमाणेच मी एकटा नसून देशातील 130 कोटी देशवासीयांनी परिपूर्ण आहे, असे मोदींनी म्हटले.

11:40 AM

देशातील माता-भगिनींच्या कार्याला सलाम

कोरोना काळातही देशातील माता-भगिनींनी मोठं काम केलंय, त्यांच्या कार्याला माझा सलाम. मुद्रा योजनेतून 70 टक्के कर्ज घेतलेल्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे, आत्मनिर्भर भारतला देशातील 70 लाख महिला आपलं योगदान देत आहेत.

11:37 AM

नवीन एफडीआय आलाय, फॉरेन डिस्ट्रक्टीव आयडॉलॉजी

सध्या एक नवीन एफडीाय अस्तित्वात आला आहे, तो फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून 'फॉरेन डिस्ट्रक्टीव आयडॉलॉजी आहे. त्यामुळे, या एफडीआयपासून देशाला वाचवायचं असेल तर, देशातील नागरिकांना जागरुक राहायला हवं. 

11:35 AM

आंदोलनजीवी ही नवीन जमात उदयास आली

वकिलांच्या आंदोलनात वकील नसतात, आंदोलनजीवी असतात विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात, असे मोदींनी म्हटले. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात.

11:35 AM

देशाला शीध बांधवांचा अभिमान आहे

फाळणी झाली सर्वात जास्त फटका पंजाबला बसला, जेव्हा दंगली झाल्या पंजाबला भोगावे लागले. जम्मू काश्मीर आणि तेथील घटनांमुळेही पंजाबला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे, शीख बांधवांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या जात आहेत. गुरुंची महान परंपरा शीख धर्मीयांना आहे. देशाला शीख बांधवांचा अभिमान आहे. 

1984 च्या दंगलीचा काळ आपणाला विसरता येणार नाही

11:29 AM

एमएसपी है, था और एमएसपी रहेगा... 

एमएसपी है, एमएसपी था, एमएसपी रहेगा.... बाजार समित्यांना अधिक मजबूत करण्या येणार आहे, त्यामुळे बाजार समित्यांमधील स्पर्धा वाढून शेतकऱ्याना फायदा होईल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये

11:28 AM

शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे - मोदी

आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आंदोलनातील वयोवद्धांना पाहून आम्हाला आनंद होत नाही. एकदा संधी देऊन पाहा, या सुधारणेमुळे फायदा होईल की नाही. त्यानंतरही आपण सुधारणा करु शकू. आंदोलनावर चर्चा होतच राहिल, पण आंदोलन मागे घ्यावे, असे मोदींनी म्हटलं

11:24 AM

लाल बहादूर शास्त्रींनीही सुधारणेला वाव दिला - मोदी

हरित क्रांतीवेळीही अशा नवीन सुधारणांमुळे सरकारला त्रास सहन करावा लागला. लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये शेतकरी मंत्रीपद घेण्यासही कुणी उत्सुक नव्हते. सी. सुब्रमण्यम यांना कृषीमंत्री करण्यात आलं. त्यावेळी, योजना आयोगानेही सुधारणांना विरोध केला होता. त्यावेळी, लाल बहादूर शास्त्रींनी कठोर पाऊल उचलून निर्णय घेतला. सुधारणांवर ठाम राहिले. त्यामुळे, पीएल 480 मागवून खाणारे आपण, आज आपल्या मातीत उगवलेलं अन्न खातोय.  
 

11:21 AM

दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे

दूध उत्पादन आणि फळबागांच्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी फायदा होत आहे, डेअरी उत्पादनाचं 28 टक्के योगदान आहे. धान्य आणि दाळींपेक्षा दूधाचा व्यापार आणि उत्पादन मोठं आहे.   

11:17 AM

शरद पवारांनी सुधारणेला विरोध केला नाही - मोदी

मी सुधारणेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवार यांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला विरोध केला नाही.

11:12 AM

गरिब शेतकऱ्यांसाठी आम्हीच शेतकरी सन्मान योजना आणली

केंद्र सरकारने गरिब शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आणली. त्यातून 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा झाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्यात आले.  सध्या शेतकरी आंदोलन कशासाठी यावर सगळेच गप्प, आंदोलन कसं चाललंय वगैरे यावर बोलले, पण मूलभूत चर्चा झाली असती तर जास्त बरं झालं असतं. कृषिमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं कुणी देत नाही... 
देवेगौडा यांचा आभारी आहे. सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलं, ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत, शेतीची मूलभूत समस्या काय, त्याची मुळं शोधली पाहिजेत...

11:05 AM

शेतकरी आंदोलनावर मूळ चर्चा होत नाही, विस्तृत चर्चा होत नाही

शेतकरी आंदोलनावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. शेतकरी आंदोलनावर मूळ चर्चा होत नाही, विस्तृत चर्चा होत नाही याच आश्चर्य वाटतंय. मी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच आभार मानतो.

11:03 AM

10:55 AM

देशाचा राष्ट्रवाद सत्यम शिवम सुंदरमने प्रेरित

देशाचा राष्ट्रवाद हा सत्यम-शिवम-सुंदरमं ने प्रेरित आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या  विचरांनी हा राष्ट्रवाद प्रेरित आहे, असे मोदींनी म्हटले. भारत हा लोकशाहीची जन्मदात्री आहे, भारताची लोकशाही केवळ मोठीच नाही, तर भारतमाता ही लोकशाहीची जननी आहे. 

10:52 AM

कोरोना काळातील घटनांची विरोधकांकडून खिल्ली

कोरोना लॉकडाऊन काळात एका वयोवृद्ध महिलेने घराबाहेर दिवा लावला. मात्र, विरोधकांनीही त्याचीही खिल्ली उडवली. देशवासीयांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचं काम विरोधकांनी करु नये

10:49 AM

देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांच राजकारण नको

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मिळालेल्या यशाचं श्रेय कुठल्याही सरकारला किंवा व्यक्तीला जात नाही.. पण, भारताला नक्कीच जातं आणि त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे?... मात्र, त्याचीही चेष्टा केली जातेय. देशाचं मनोधैर्य खच्ची करतील, अशा विषयांचं राजकारण करू नका!

10:47 AM

मैथिलीशरण गुप्त यांच्या कविताने मोदींनी केली भाषणाची सुरुवात

अवसर तेरे लिए खड़ा है,
फिर भी तू चुपचाप पड़ा है।
तेरा कर्मक्षेत्र बड़ा है,
पल पल है अनमोल।
अरे भारत! उठ, आँखें खोल॥

आज जर त्यांनी कविता केली असती तर काय असती....

अवसर तेरे लिए खडा है
तू आत्मविश्वास से भरा पडा है
हर बाधा हर बंदिश को तोड
अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड

10:39 AM

मोदींच्या भाषणाकडे देशाचे लक्ष, शेतकरी आंदोलनावर चर्चा करणार

Web Title: Narendra Modi in Rajya Sabha Live: Speech on President's address, Narendra Modi will speak on farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.