नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:20 PM2024-06-07T14:20:34+5:302024-06-07T14:22:23+5:30

Narendra Modi News: आजचा क्षण माझ्यासाठी भावूक आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

narendra modi remembers balasaheb thackeray in the speech at the nda meeting | नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...

नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...

Narendra Modi News: लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सर्व घटक पक्षांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करत केला. या बैठकीत एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून ९ जून रोजी शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी एनडीए बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. 

एनडीए घटकपक्षाचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार यांचे मनापासून आभार मानतो. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, इतक्या मोठ्या समुहाचे स्वागत करण्याची संधी मिळाली. जे खासदार निवडून आले आहेत ते अभिनंदनास पात्र आहेत. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन, या उन्हाच्या झळा सोसत खूप परिश्रम घेतले. त्या सर्व कार्यकर्त्यांना या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमधून वंदन करतो, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. 

नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण

नरेंद्र मोदींनीही विस्तृत भाषण करत, घटकपक्षांचे आभार मानले. आजचा क्षण माझ्यासाठी भावूक असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी एनडीएची बीजे रोवणाऱ्या देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे घेतली. त्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव घेतले. याशिवाय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयींसह एनडीच्या स्थापनेतील दिग्गज नेत्यांचा उल्लेख करत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.

दरम्यान, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढे नेले, जगात देशाचे नाव चमकावले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करुन नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळेच खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देशातील जनतेले नाकारले आणि तिसऱ्यांदा मोदींना स्वीकारले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीए बैठकीत बोलताना सांगितले.
 

Web Title: narendra modi remembers balasaheb thackeray in the speech at the nda meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.