मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 25, 2020 09:19 PM2020-12-25T21:19:24+5:302020-12-25T21:20:26+5:30

ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

Narendra modi said mamata banerjees ideology destroyed west bengal didi counter attack | मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ममता बॅनर्जी सरकारवर मोठा आरोप केला. मोदी म्हणाले, ममता या आपल्या राजकीय अजेंड्यापोटी शेतकऱ्यांसाठी असलेल्या एक केंद्रीय लाभ योजनेत आडथळा आणत आहेत. तसेच राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना मुख्य पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यास नकार देत आहेत. ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

मोदी म्हणाले, "आपण ममताजींची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली, तर आपल्याला समजेल, की त्यांच्या विचारधारेने बंगालला किती बर्बाद केले? जनता स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांना अत्यंत जवळून पाहत आहे. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासंदर्भात भाष्यही न करणारा पक्ष येथे दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावावर त्रास देत आहे. देशाची अर्थव्यवस्था बर्बाद करत आहे."

यावर, ममतांनीही पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या मोदी सरकारने पश्चिम बंगालच्या मदतीसाठी "काहीही केलेले नाही. अद्यापही थकबाकीच्या 85,000 कोटी रुपयांचा एक भागही त्यांनी दिलेला नाही. यात 8,000 कोटी रुपयांच्या अनपेड जीएसटीचाही समावेश आहे.'

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्लीजवळ आंदोलन करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना समर्थन देणाऱ्या ममता म्हणाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधानांनी केवळ त्यांच्यासाठी एक स्पष्ट संबोधनाच्या माध्यमाने आपली चिंता दाखवली.

आपण माझी विचारधारा आणि बंगालच्या लोकांप्रती माझ्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले, तर मी सांगू इच्छिते, की माझी विचारधारा या देशाच्या संस्थापक पित्याच्या दृष्टीशी  अनुरूप आहे. मी अंतःकरणाने, प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने जनतेची सेवा केली आहे. जे काही माझ्या सोबत आहे, त्याबरेबर माझ्यासाठी राज्यातील लोकच माझे कुटुंब आहे.

येणाऱ्या काही दिवसांत बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. येथील राजकारण सध्या जबरदस्त तापले आहे. 

Web Title: Narendra modi said mamata banerjees ideology destroyed west bengal didi counter attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.