नरेंद्र मोदींनी माफी मागावी, कॉंग्रेसचा अधिवेशनावर बहिष्कार
By admin | Published: February 8, 2017 09:54 PM2017-02-08T21:54:22+5:302017-02-08T21:56:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला फक्त डॉ. मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींच्या या व्यक्तव्यावर राज्यसभेतील काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला.
दरम्यान, याप्रकरणी नरेंद्र मोदी जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत संसदेच्या दोन्हा सभागृहातील अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालण्यात येईल, असा पवित्रा कॉंगेसने घेतला आहे.
Congress to boycott PM Modi in both houses of Parl for rest of budget session till he apologises for his remark on Dr.Manmohan Singh:Sources
— ANI (@ANI_news) February 8, 2017