नरेंद्र मोदी भाजपा युगातील श्रावणकुमार - आप

By Admin | Published: July 13, 2017 05:56 PM2017-07-13T17:56:04+5:302017-07-13T18:00:25+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपायुगातील श्रावणकुमार असल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे.

Narendra Modi Shravan Kumar of BJP era - you | नरेंद्र मोदी भाजपा युगातील श्रावणकुमार - आप

नरेंद्र मोदी भाजपा युगातील श्रावणकुमार - आप

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपायुगातील श्रावणकुमार असल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. आप पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर नरेंद्र मोदी यांचे एक कार्टून शेअर केले आहे. त्याखाली त्यांनी भाजपा युगातील श्रावण कुमार असे लिहले आहे. आपने ट्विटरवर पोस्ट केलेल्या कार्टूनमध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे. मोदी हे अडानी आणि अंबानी यांचे श्रावणकुमार असल्याची टीका आपनं या पोस्टमध्ये केली आहे.

आप पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केलेल्या कार्टूनमध्ये नरेंद्र मोदी श्रावणकुमार सारखे खांद्यावर कावड घेतलेलं दाखवण्यात आले आहे. कावडच्या एका टोकरीमध्ये अडानी तर दुसऱ्या टोकरीमध्ये अंबानी दाखवण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या विदेश दौऱ्यावरही टीका केली आहे. विदेश दौऱ्यातून मोदी अडानी आणि अंबानीला मदत करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आपनं शेअर केलेल्या कार्टूननुसार ऑस्ट्रेलियामध्ये मोदीमुळे अडानीना कोळाशाच्या खाणीची मंजुरी मिळाली आहे. तर बांगलादेशमध्येही एका प्लांटला मंजुरी मिळाल्याचा दावा आपनं केला आहे. कार्टूनमध्ये एका ठिकाणी मुकेश अंबानीने अमेरिकासोबत केलेल्या 15 हजार कोटींरुपये किंमतीच्या करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, आप पक्षाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटीझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अबेध बालकने मुख्यमंत्री केजरीवाल आणि पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा फोटो शेअर करत भारतयुगचे जयचंद असे कॅपशन दिलं आहे. राकेश जयजंच आपली प्रतिक्रिया देताना मोदीचं हेच खरे रुप असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मास्टर यांनी केजरीवालवर निशाना साधला आहे. ते म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मजाक उडवणाऱ्या पार्टीचे विचार अणखी कसे असू शकतात. असल्या कारनाम्यामुळे आप पक्षाचे कार्यकर्ते खूश होतील भारतीय नाही.

 

Web Title: Narendra Modi Shravan Kumar of BJP era - you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.