Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:45 PM2023-07-01T12:45:39+5:302023-07-01T12:53:34+5:30

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत.

Narendra Modi: Some have to be removed to make new ministers, PM to explain why on July 3 | Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

Narendra Modi: नवीन मंत्री करण्यासाठी काहींना हटवावे लागतेय, पंतप्रधान ३ जुलै रोजी सांगणार कारण 

googlenewsNext

- संजय शर्मा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलापूर्वी मंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना २०२४चा रोडमॅप देऊन मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या राजकीय अपरिहार्यतेशी जोडणार आहेत.

सर्व मंत्र्यांनी चांगले काम केले आहे. परंतु, राजकीय अपरिहार्यतेमुळे - मंत्रिमंडळातील चेहरे बदलावे लागतात. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे काही जणांना हटवावे लागू शकते. हटविण्यात आलेल्या मंत्र्यांनी नाराज होऊ नये. ही एक राजकीय प्रक्रिया आहे, असे पंतप्रधान सांगणार आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

 

Web Title: Narendra Modi: Some have to be removed to make new ministers, PM to explain why on July 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.