मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 01:58 PM2024-06-09T13:58:39+5:302024-06-09T13:59:49+5:30
Narendra Modi Swearing Ceremony : नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथवविधीला आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या आज होणाऱ्या शपथविधीमध्ये कुणाकुणाला संधी मिळणार आहे, याबाबती काही नावं समोर आली आहेत.
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथवविधीला आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या आज होणाऱ्या शपथविधीमध्ये कुणाकुणाला संधी मिळणार आहे, याबाबती काही नावं समोर आली आहेत. मागच्या दोन निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच भाजपाला यावेळी उत्तर प्रदेशात केवळ ३३ जागा मिळाल्यात. त्यामुळे आज होणाऱ्या शपथविधीमध्ये मोदी सरकारमधील महाराष्ट्राचा वाटाही घटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधून सरकारमध्ये कुणाकुणाला संधी मिळेल, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीत उत्तर प्रदेशमधील १२ मंत्री होते. त्यापैकी ७ जणांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेल्यांमध्ये स्मृती इराणींसारख्या दिग्गज मंत्र्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज होणाऱ्या शपथविधीमध्ये उत्तर प्रदेशमधील मोजक्याच नेत्यांना संधी मिळण्यासी शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील मित्रपक्ष असलेल्या अपना दल (एस) च्या प्रमुख अनुप्रिया पटेल आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांचा समावेश आहे. दरम्यान आज होणाऱ्या शपथविधीमध्ये उत्तर प्रदेशमधून राजनाथ सिंह, एसपी सिंह बघेल, डॉ. महेश शर्मा, स्मृती इराणी, जयंत चौधरी आणि अनुप्रिया पटेल यांना संधी मिळू शकले.
दरम्यान, मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये बंपर यश मिळवलं होतं. २०१४ मध्ये भाजपाला ७१ तर २०१९ मध्ये ६२ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राहुल गांधींच्या काँग्रेसने केलेल्या इंडिया आघाडीने भाजपाला जबरदस्त धक्का दिला. त्यामुळे ७० जागा जिंकण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भाजपाला अवघ्या ३३ जागांवर समाधान मानावे लागले होते. ही बाब भाजपासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातून पुढील गणिते जुळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार आहे.