'नमोपर्व 2.0' सुरू; नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 07:10 PM2019-05-30T19:10:10+5:302019-05-30T19:11:19+5:30

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Narendra Modi takes oath as the Prime Minister of India for a second term | 'नमोपर्व 2.0' सुरू; नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ  

'नमोपर्व 2.0' सुरू; नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ  

googlenewsNext
ठळक मुद्देजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.६.५७ वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले

'मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं...' हा २६ मे २०१४ रोजी घुमलेला आवाज आज बरोब्बर ५ वर्षं ४ दिवसांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून देशभरात घुमला आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे ६ हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते.  

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. परंतु, यावेळी SAARC ऐवजी BIMSTEC संघटनेतील राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून मोदींनी पाकिस्तानला सीमेपार ठेवून आपले इरादे स्पष्ट केले. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचे प्रमुख या सोहळ्याचे साक्षीदार झाले.




'मोदी सरकार 2' च्या शपथविधी सोहळ्यासाठी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासूनच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मान्यवर जमू लागले होते. ६.५७ वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले. पुढच्या पाचच मिनिटांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झालं आणि राष्ट्रगीताची धून वाजली. त्यानंतर ७.०४ च्या ठोक्याला नरेंद्र दामोदरदास मोदींचं नाव पुकारण्यात आलं आणि काही सेकंदातच ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं...’ अशी शपथ ऐकताना सगळेच भारावले.





 

Web Title: Narendra Modi takes oath as the Prime Minister of India for a second term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.