नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:35 AM2018-03-10T01:35:07+5:302018-03-10T01:35:07+5:30
तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा व ईशान्येतील राज्यांमध्ये भाजपाला मिळालेला विजय यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करतील, अशी चर्चा आहे. काही मंत्र्यांच्या कामावर पंतप्रधान नाराज आहेत. त्यामुळे कोणावर अतिरिक्त जबाबदारी देण्याऐवजी नव्या चेहºयांना संधी दिली जावी, असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.
एक नेता म्हणाला की, ईशान्येत भाजपाला यश मिळवून देण्यात भूमिका बजावलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊन सन्मानित केले जाऊ शकेल.
राज्यसभा निवडणुकांनंतरच फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल. मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदलाबाबतही निर्णय होईल. केरळ, ओडिशा व तामिळनाडूमध्ये स्थिती सुधारण्याचा दबावही सध्या पक्षावर आहे. उत्तरेत पक्षाला लोकसभेत मिळणाºया जागांमध्ये घट झाल्यास त्यांची भरपाई या तीन राज्यांमधून व्हावी, असे गणित पक्षाला जुळवायचे आहे.