Narendra Modi: पंतप्रधानांकडून 'लाल मिरची' कुटण्याची टिप्स, मोदी-ममतांचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 01:27 PM2022-05-01T13:27:50+5:302022-05-01T13:32:21+5:30
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय शत्रुत्त्व देशाला परिचीत आहे. भाजपने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केला. मात्र, प. बंगाल जिंकण्यात भाजपला अपयश आलं. त्यामुळेच, ममता यांचा दिल्लीत आणि भाजपात वेगळाच दबदबा आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कट्टरता असली तर व्यक्तीगत पातळीवर दोघांचीही केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमात ही केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसून आली.
राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जीही आल्या होत्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीजेआय एन.व्ही. रमण हेही उपस्थित होते. या कार्यक्रमातील ब्रेकमध्ये चहा पिताना ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यावेळी, मोदींनी लाल मिरचीसंदर्भात ममता यांना काही टिप्स दिल्या. सध्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Modi Ji asked her to use #LaalMirch… he didn’t bother to specify where to use it.
— Rupa Murthy (@rupamurthy1) April 30, 2022
Explains Mammu ko Mirchi Kyu lagi hai 😂😂😂 pic.twitter.com/pDKAOvKNdr
विज्ञान भवन येथील कार्यक्रमात मोदींची भेट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत गप्पा रंगल्या. त्यावेळी, मोदींनी लाल मिरचीसंदर्भात काही सूचना ममता यांना केल्या. ममता यांनीही अगदी मन लावून मोदींचा तो किस्सा ऐकल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सीजेआय रमण हेही या व्हिडिओत दिसत आहेत. ममता आणि मोदी यांचं राजकीय वैर कट्टर आहे, मात्र दोघांमधी व्यक्तगीत हितसंबंध चांगले आहेत. म्हणूनच, ममता दिदी मोदींना आवर्जुन बंगालचे प्रसिद्ध आंबे पाठवतात.