‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 01:09 PM2018-06-24T13:09:00+5:302018-06-24T13:20:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योग, खेळ, जीएसटी आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याविषयी चर्चा केली.
जगभरात नुकताच साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी ते म्हणाले, जगाभरात योग दिवस उत्साहात साजरा झाला. योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि अनेक महिलांनीही योगासने केली. जाती आणि धर्मातील सर्व सीमा तोडून देश योग करत आहे.
नरेंद्र मोदी यांनी जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली. ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. 23 जूनला श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. ते अवघ्या 33 व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु बनले होते. भारतातील औद्योगिक वाढीत श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
Remembering the contributions of Dr. Shyama Prasad Mookerjee. #MannKiBaathttps://t.co/fkSmVsaaPhpic.twitter.com/x1BCvHWfvN
— narendramodi_in (@narendramodi_in) June 24, 2018
याबरोबर, पुन्हा जीएसटीच्या मुद्दावर नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. देशात प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यासोबतच, भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्याचा उल्लेख विजयानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान संघासोबत चषक घेतला होता, या निर्णयाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच, अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याचाही यावेळी उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला.
GST is the celebration of honesty, says PM @narendramodi#MannKiBaathttps://t.co/fkSmVsaaPhpic.twitter.com/e6EkOLRAbX
— narendramodi_in (@narendramodi_in) June 24, 2018