मोदी भक्तासाठी साक्षात मोदींचं ट्विट

By admin | Published: March 15, 2017 04:10 PM2017-03-15T16:10:46+5:302017-03-15T16:10:46+5:30

मोदी स्वतःच्या चाहत्यांच्या ट्विटलाही ब-याचदा न विसरता चोख प्रत्युत्तर देत असतात.

Narendra Modi tweet | मोदी भक्तासाठी साक्षात मोदींचं ट्विट

मोदी भक्तासाठी साक्षात मोदींचं ट्विट

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहभान हरपून जनतेसाठी काम करतायत. त्यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकांची हृदय जिंकली आहेत. प्रत्येक भारतीय नरेंद्र मोदींची न्यू इंडिया संकल्पना कधी प्रत्यक्षात उतरले आहे, याची आतुरतेनं वाटत पाहत आहे. तसेच भाजपानं देशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या उत्तर प्रदेशमधीलही सत्ता काबीज केली आहे.

उत्तर प्रदेशमधल्या विजयानंतर दिलेल्या एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सरकार प्रत्येकासाठी काम करेल, असं आश्वासन दिलं होतं. तसेच 2022पर्यंत न्यू इंडिया प्रत्यक्षात साकारणार असल्याचंही नरेंद्र मोदींनी जनतेला वचन दिलं आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, न्यू इंडियात गरिबांना संधी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्लीच्या दिवसांत ट्विटरवर ब-यापैकी कार्यरत असतात. मोदी स्वतःच्या चाहत्यांच्या ट्विटलाही ब-याचदा न विसरता रिट्विट करून चोख प्रत्युत्तर देत असतात. अशातच मोदींचा एक चाहता अजित सिंह यानं मोदींच्या कामावर खूश होऊन त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

मोदींच्या या चाहत्याला एकानं ट्विट करून तू मोदींसाठी काम करतोस काय, असं विचारलं, त्यावर त्या चाहत्यानंही समोरच्याला समर्पक उत्तर दिलं. मी मोदींसाठी नव्हे तर मोदी माझ्यासाठी काम करत असल्याचं तो ट्विटमधून म्हणाला आहे. हा सर्व प्रकार पाहून मोदींनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.

मोदी रिट्विट करत म्हणाले, नक्कीच, प्रत्येक भारतीयासाठी मी प्रधान सेवकांचं काम करत असल्याचा मला आनंद आहे. त्यानंतर ट्विटरवरून मोदींनी अनेकांची मनं जिंकली. पंतप्रधान असतानाही मोदींनी प्रधान सेवक म्हणून स्वतःला म्हटल्यानं अनेकांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

 

Web Title: Narendra Modi tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.