Narendra Modi: आधी ढोल आता डमरू; काशी विश्वनाथ मंदिरात दिसला मोदींचा अनोखा अंदाज,VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:28 PM2022-03-04T21:28:12+5:302022-03-04T22:34:46+5:30
Narendra Modi: जानेवारी महीन्यात पीएम मोदींनी त्रिपुरामध्ये पारंपरिक वाद्य वाजवले होते. तो व्हिडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता.
वाराणसी: येत्या 7 मार्चला उत्तर प्रदेशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचा(Narendra Modi) लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही मतदान होत आहे. त्यामुळेच भाजपने प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. आज त्यांनी वाराणसीतील मिर्झापूर येथे रोड शो केला. त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात पोहोचल्यानंतर पीएम मोदींनी डमरुवर हात आजमावला.
#WATCH | PM Modi tries his hand at 'damru' at Kashi Vishwanath Temple in Varanasi, post his roadshow ahead of the last phase of #UttarPradeshElections2022pic.twitter.com/N7HaEtlETx
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांचे मंदिराच्या पुजाऱ्यांनी ढोल-ताशाच्या गररात स्वागत केले. मंदिराबाहेर पीएम मोदींनी स्वतः पुजाऱ्याच्या हातातील डमरू वाजवला. पीएम मोदींचे डमरू वाजवतानाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, पंतप्रधानांचा वेगळा अंदाज दिसण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही विविध ठिकाणी मोदींचा वेगळा अंदाज दिसला आहे.
मणिपूरमध्ये पंतप्रधानांनी ढोल वाजवला
जानेवारी महिन्यात पीएम मोदी पारंपारिक त्रिपुरा आणि मणिपूरच्या दौऱ्यावर होते. तेव्हा मोदींनी तेथे पारंपारिक वाद्ये वाजवले होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तेथे वाद्य वाजवले जात होते. त्यावेळी कलाकारांमध्ये जाऊन पीएम मोदींनी ढोल वाजवला. त्याचप्रकारे आजही काशी विश्वनाथ मंदिरात मोदी त्यांच्या स्वागतात डमरू वाजवताना पाहून इतके प्रभावित झाले की, ते डमरू वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.