चीननंतर पंतप्रधान मोदी नेपाळच्या भेटीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 01:15 PM2018-05-01T13:15:40+5:302018-05-01T13:15:40+5:30

पंतप्रधान 11 मे रोजी नेपाळला जाणार असून ते नेपाळचे पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी विविध द्वीपक्षीय विषयांवर चर्चा करतील. ओ

Narendra Modi to visit Nepal in May, plans to meet Bangladesh PM too  | चीननंतर पंतप्रधान मोदी नेपाळच्या भेटीवर जाणार

चीननंतर पंतप्रधान मोदी नेपाळच्या भेटीवर जाणार

googlenewsNext

नवी दिल्ली- वुहान येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात नेपाळच्या भेटीवर जाणार आहेत. त्याचबरोबर ते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान 11 मे रोजी नेपाळला जाणार असून ते नेपाळचे पंतप्रधान के. पी.ओली यांच्याशी विविध द्वीपक्षीय विषयांवर चर्चा करतील. ओली यांनी एप्रिल महिन्यामध्ये भारताला भेट दिली होती. यामध्य़े भारत आणि नेपाळ यांच्यामधील संबंधांवर चर्चा झाली होती. त्याचबरोबर शांतीनिकेतन येथे बांगलादेश भवनच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. तेथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही ते भेट घेतील. हे भवन बांगलादेश सरकारच्या मदतीने बांधण्यात आले आहे. या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. भारतही बांगलादेशबरोबर विविध प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात आहे.

भारताच्या दहशातवादविरोधी भूमिकेस बांगलादेशाने चांगली साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि शेख हसिना वाजेद यांची गेल्या महिन्यामध्ये लंडनमध्ये भेट झाली होती. राष्ट्रकूल परिषदेच्यावेळेस हे दोन्ही नेते लंडन येथे गेले होते. शेख हसिना आणि ओली यांच्या भेटीमुळे जून महिन्यात बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्नीकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या म्हणजेच बिमस्टेकच्या बैठकीस मदत होणार आहे. ही बैठक नेपाळमध्य़े होणार आहे. बिमस्टेकच्या सात सदस्यांमधील सौहार्द वाढविण्यासाठी भारत प्रयत्न करत आहेत. इस्लामाबाद येथील सार्क परिषदेस भारत उपस्थित राहाणार नसल्याचे भारताने नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी इंडोनेशिया आणि सिंगापूरच्या भेटीवर जाणार आहेत.

Web Title: Narendra Modi to visit Nepal in May, plans to meet Bangladesh PM too 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.