Narendra Modi : जर्मनीत जनतेला संबोधित करत होते मोदी, भाजपला 2024 साठी मिळाला नवा नारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:20 PM2022-05-04T17:20:05+5:302022-05-04T17:21:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीमध्ये बर्लिन येथील पॉट्सडॅमर प्लॅट्झच्या थिएटरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. या वेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा व्यासपीठावर असतात, तेव्हा त्या कार्यक्रमाचा नजारा काही वेगळाच असतो. अगदी सातासमुद्रापारही पीएम मोदींच्या चाहत्यांची कमी नाही. काहिसा असाच नजारा सोमवारी जर्मनीतील बर्लिन येथे बघायला मिळाला. येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी मुळ भारतीय असलेल्या जनतेला संबोधित करत होते आणि संपूर्ण सभागृह मोदींच्या घोषणांनी दूमदुमून गेले होते. याच कार्यक्रमादरम्यान दिला गेलेला एक नवा नारा, आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जर्मनीमध्ये बर्लिन येथील पॉट्सडॅमर प्लॅट्झच्या थिएटरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. या वेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. संपूर्ण थिएटर मोदींच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. तासभर चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान, उपस्थित लोक पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान भारत माता की जय, मोदी है तो मुमकीन है आणि 2024 - मोदी वन्स मोअरच्या घोषणा देत होते.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आता भारताने धृड संकल्पासह पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. या भारताने तीन दशकांची राजकीय अस्थिरता एक बटण दाबून संपवली आहे. आता भारताला प्रत्येक मताची किंमत समजली आहे."
मेदी म्हणाले, "आता नवा भारत जोखीम पत्करण्यासाठी, नवनिर्माणासाठी आणि इनक्यूबेट करण्यासाठी तयार आहे. भारतात 2014 च्या जवळपास 200-400 स्टार्टअप होते. आज भारत 68,000 स्टार्टअप्स आणि डझनभर युनिकॉर्नचे घर आहे. यांपैकी काही आधीच 10 अब्ज यूएस डॉलरसह डेका-कॉर्न बनले आहेत."