Narendra Modi: 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:32 PM2022-03-10T20:32:56+5:302022-03-10T21:06:59+5:30

आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर मला विशेषत: देशातील महिलांचे, माता भगिनींचे आभार मानायचे आहेत.

Narendra Modi: 'Where women got more votes, BJP got bumper victory in vidhansabha election | Narendra Modi: 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला'

Narendra Modi: 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला'

Next

नवी दिल्ली - देशाच्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये कमळ फुलविण्यात यश मिळवलं असून भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर कार्यालयापासून लखनौपर्यंत भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. युपीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाच सेलिब्रेशन होत असताना पतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयी सभेला संबोधित करताना जनतेचे आभार मानले. तसेच, विरोधकांवर जोरदार प्रहारही केला. 

आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर मला विशेषत: देशातील महिलांचे, माता भगिनींचे आभार मानायचे आहेत. कारण, या माता-भगिनींनी मोठ्या संख्येनं भाजपला मतदान केलंय. सरकारने नेहमीच महिलांच्या समस्या जाणून त्यांना प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच, महिलांनी भाजपला भरभरुन मतदान दिलं. 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला', असे मोदींनी म्हटले. 

या वाक्यावर पडल्या टाळ्या

2019 मध्ये जेव्हा लोकसभेत आम्ही विजयी झालो, तेव्हा राजकीय विशेषज्ञांनी सांगितलं होतं, हा निकाल आधीच ठरला होता. कारण, 2017 च्या निकालाने हे स्पष्ट केले होते. आता, 2022 च्या निकालावरुन 2024 चा निकाल स्पष्ट आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींच्या या वाक्यावर, या भाष्यावर मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या, उपस्थित लोकांनी मोदींच्या या भाकितला दादा दिली. 

कोरोना काळातील काम नैतिकतेवरच 

कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून सध्याचा काळ गेलाय. या काळात ही निवडणूक झाली आहे. या परिस्थितीचा गंभीर परिणाम विश्वावर झालाय. मात्र, भारत सरकारने या काळात गरिबांसाठी, आर्थिक परिस्थितीवर जे निर्णय घेतले, त्यातून भारत वाचला. कारण, आमची नैतिकता जमिनीवर होते. आमचे प्रयत्न निष्ठा आणि नियतीवरच पुढे गेले, असे मोदींनी म्हटले. विकासाचं काम अधिक गतीवान झाले. 

सध्या सुरू असलेल्या युद्धाचा प्रभाव जगावर होत आहे. मात्र, जे देश युद्ध लढत आहेत, त्यांच्याशी आर्थिक, सुरक्षा, शिक्षण, राजकीयदृष्टीतून भारताचं नातं आहे. सध्या तेल, गॅस, फर्टीलायजर, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये महागाई वाढत आहे. या कठिण परिस्थितीतही यंदाच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास भारत आत्मनिर्भर होत असल्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. जगभरातील या अनिश्चितेच्या वातावरणात भारताच्या जनतेनं, विशेषत: उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे. या निवडणुकीत लोकांना स्थीर सरकारसाठी मतदान केले, म्हणजे लोकशाही भारतीयांच्या नसानसात आहे. 

ऑपरेशन गंगा मोहिमेला प्रांतावादाशी जोडलं

युक्रेनमध्ये भारताचे हजारो नागरिक अडकले होते, तेव्हाही देशातील काहीजणांनी भारताचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे 'ऑपरेशन गंगा' या मोहिमेलाही प्रांतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीला जातीवाद, प्रदेशवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे, असे मोदींनी म्हटले. मी निवडणुकांमध्येही विकासाच्याच गोष्टी केल्या. गरिबांना घर, गरिबांची प्रगती, विकास याच मुद्द्यावर मी भाष्य केलं.     

तपास यंत्रणांना बदनाम करण्याचं काम

देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला का नाही, एखाद्या भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध कारवाई झाल्यास त्यास धर्म, जाती, प्रांतवादाशी जोडले जाते. न्यायालयाने एखाद्या माफियाविरुद्ध निकाल दिल्यानंतरही हे लोक त्यास वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करतात. सध्या, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या संस्थांना बदनाम करण्यात येत आहे. या संस्थांवर दबाव टाकण्यात येत आहे. तपास यंत्रणांना थांबवण्यासाठी ईको सिस्टीमसोबत मिळून नवनवीन डाव रचला जात आहे. त्यामुळे, देशातील प्रामाणिक लोकांनी एकत्र येऊन या कटूनितीचा विरोध केला पाहिजे, या राजकारणाला थारा देता कामा नये, असे मोदींनी म्हटले.  

Web Title: Narendra Modi: 'Where women got more votes, BJP got bumper victory in vidhansabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.