नरेंद्र मोदी उचलणार दहशतवादाचा मुद्दा

By Admin | Published: November 15, 2015 02:58 AM2015-11-15T02:58:12+5:302015-11-15T02:58:12+5:30

रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळ्या पैशाच्या शोधात जागतिक सहकार्य हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे

Narendra Modi will pick up the issue of terrorism | नरेंद्र मोदी उचलणार दहशतवादाचा मुद्दा

नरेंद्र मोदी उचलणार दहशतवादाचा मुद्दा

googlenewsNext

अंताल्या : रविवारपासून येथे सुरू होणाऱ्या जी-२० संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद, हवामान बदल आणि काळ्या पैशाच्या शोधात जागतिक सहकार्य हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनावर पॅरिसमधील दहशतवादी हल्ला आणि सीरियातील युद्धाचे सावट राहणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली असताना जगातील २० मुख्य अर्थसत्ता असलेल्या देशांच्या नेत्यांचे हे संमेलन होत आहे. संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन, इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, जर्मनीच्या चान्सलर एंजला मेर्कल आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अन्य देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील. तुर्कीच्या या निसर्गरम्य शहरात जगभरातील नेते एकत्रित येत असताना पॅरिसवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला, शेजारील सीरियात सुरू असलेले युद्ध, क्षेत्रातील शरणार्र्थींचे संकट आणि दहशतवादाचा एकजुटीने लढा हे संमेलनातील महत्त्वाचे मुद्दे असतील. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइ ओलंद हे जी-२० संमेलनात सहभागी होणार होते. परंतु त्यांनी दौरा रद्द केला आहे. दरम्यान, यजमान देशाकडून या दहाव्या जी-२० संमेलनात सीरियात सुरू असलेला संघर्ष, दुसऱ्या विश्वयुद्धानंतरच्या निर्वासितांशी संबंधित सर्वांत मोठ्या संकटावर चर्चा करण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
द्विपक्षीय बातचीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यानंतर लंडन येथून रात्री येथे पोहोचत असून, या संमेलनाच्या निमित्ताने ते
जी-२० देशांचे काही नेते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएफएम) प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड यांच्यासोबत द्विपक्षीय बातचीत करू शकतात.

Web Title: Narendra Modi will pick up the issue of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.