नोटा बदलण्यासाठी नरेंद्र मोदींची ९७ वर्षांची आई बँकेत
By admin | Published: November 16, 2016 01:28 AM2016-11-16T01:28:44+5:302016-11-16T01:28:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (९७) नोटा बदलण्यासाठी मंगळवारी गांधीनगर येथील बँकेत आल्या. रायसान येथील ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्समध्ये हिराबा
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (९७) नोटा बदलण्यासाठी मंगळवारी गांधीनगर येथील बँकेत आल्या. रायसान येथील ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्समध्ये हिराबा या व्हीलचेअरवर पोहोचल्या. त्यांनी ४,५०० रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या. पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन आलेल्या हिराबा यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करीत फॉर्म भरला. त्यावर अंगठ्याची निशाणी करीत नोटा बदलून घेतल्या. गांधीनगरच्या बाहेरील भागात रायसानमध्ये हिराबा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. पंतप्रधान मोदी हे १७ सप्टेंबर रोजी आपल्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. हिराबा नेहमी रिक्षातून प्रवास करतात. मागील वेळी त्या तपासणीसाठी गांधीनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आॅटोरिक्षाने गेल्या होत्या.