देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार, नरेंद्र मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 10:22 PM2017-10-14T22:22:51+5:302017-10-14T22:23:30+5:30

जगातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील २० विद्यापीठांना १० हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Narendra Modi's announcement will fund 10 universities for 20 universities in the country | देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार, नरेंद्र मोदींची घोषणा

देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटींचा निधी देणार, नरेंद्र मोदींची घोषणा

Next

पाटणा- जगातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील २० विद्यापीठांना १० हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 20 पैकी 10 विद्यापीठं सरकारी तर 10 विद्यापीठं हे खासगी असतील, कामगिरीच्या आधारे विद्यापीठांना हा निधी दिला जाईल. पुढील पाच वर्षात या २० विद्यापीठांना जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्यांचही नरेंद्र मोदींनी म्हंटलं आहे.

पाटणा विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी पाटण्यात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे नरेंद्र मोदी बोलत होते.  या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच मंचावर आले होते. नितीशकुमार यांनी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी केली. यावर मोदींनी नवी घोषणाच केली. ‘मी पाटणा विद्यापीठाला आणखी एक पाऊल पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. आता आम्ही देशातील २० विद्यापीठांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. कामगिरीच्या आधारे विद्यापीठांना हा निधी दिला जाईल, असं मोदींनी म्हंटलं.

आधीच्या पंतप्रधानांनी माझ्यासाठी अनेक चांगली कामं सोडून दिली आहेत. असंच एक चांगले काम करण्याची संधी मला आज मिळाली. पाटणा विद्यापीठाने देशाला दिग्गज मंडळी दिली आहेत. प्रत्येक राज्यांमधील प्रशासकीय सेवेतील किमान एक अधिकारी पाटणा विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडला आहे, असंही मोदी म्हणाले.

बिहारवर सरस्वतीची कृपा आहे, आणि आता केंद्र सरकारकडून लक्ष्मीची कृपाही होऊ शकते. बिहारला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल. बिहारला २०२२ पर्यंत समृद्ध राज्य करायचे आहे, असं मोदींनी म्हंटलं. बिहारच्या विकासात नितीशकुमार यांचे मोलाचं योगदान असल्याचं सांगत मोदींनी मुख्यमंत्र्यांचं यावेळी कौतुक केलं. 

Web Title: Narendra Modi's announcement will fund 10 universities for 20 universities in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.