नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद सरस्वती कालवश

By Admin | Published: September 24, 2015 09:01 AM2015-09-24T09:01:10+5:302015-09-24T09:03:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद सरस्वती बुधवारी रात्री ऋषीकेश येथे निधन झाले.

Narendra Modi's master Swami Dayanand Saraswati Kalvash | नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद सरस्वती कालवश

नरेंद्र मोदींचे गुरू स्वामी दयानंद सरस्वती कालवश

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

डेहराडून. दि. २४ -  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद सरस्वती यांचे बुधवारी रात्री ऋषीकेश येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  ' स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनामुळे आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना' असे ट्विट करत मोदींनी त्यांच्या गुरूंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

स्वामी दयानंद सरस्वती गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या १० दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र उपचारांदरम्यानच काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोदींनी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. 

स्वामी सरस्वती यांचा जन्म १९३० साली मंजाकुडी येथे झाला होता. स्वामी चिन्मयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षण घेण्यास सुरवात केली.

Web Title: Narendra Modi's master Swami Dayanand Saraswati Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.