ट्विटरवर नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 23:53 IST2018-03-13T23:53:36+5:302018-03-13T23:53:36+5:30
सोशल मीडियावर आपली लोकप्रियता वाढवून दाखवण्यासाठी अनेक जणांकडून फेसबूक, ट्विटरवर खोटे फॉलोअर गोळा केले जात असल्याचे तुमच्या माहितीत असेल. आता तर ट्विटरने ट्विटर अकाऊंटवर बेसुमार खोटे फॉलोअर असलेल्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे.

ट्विटरवर नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर
नवी दिल्ली - सोशल मीडियावर आपली लोकप्रियता वाढवून दाखवण्यासाठी अनेक जणांकडून फेसबूक, ट्विटरवर खोटे फॉलोअर गोळा केले जात असल्याचे तुमच्या माहितीत असेल. आता तर ट्विटरने ट्विटर अकाऊंटवर बेसुमार खोटे फॉलोअर असलेल्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जगात सर्वाधिक फेक फॉलोअर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असल्याचे समोर आले असून, त्यांच्या एकूण फॉलोअर्सपैकी 60 टक्के फॉलोअर फेक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
फेक अकाउंट शोधण्यासाठी ट्विटरकडून नुकतेच ऑडिट करण्यात आले होते. यामध्ये या फेक फॉलोअर्सचे पितळ उघडे पडले आहे. सर्वाधिक फेक फॉलोअर्स असलेल्या यादीत मोदींचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मोदींचे ट्विटरवर एकूण चार कोटी फॉलोअर्स आहेत. त्यापैकी तब्बल 2 कोटी 40 लाख फॉलोअर्स बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोदींच्याखालोखाल पोप फ्रान्सिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 37 टक्के फॉलोअर्स बनावट आहेत.