तरुणाने लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो, म्हणाला, अहेर आणू नका पण, मत मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 05:56 PM2018-11-26T17:56:40+5:302018-11-26T17:58:57+5:30

लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर सामान्यपणे देवदेवतांची, शुभ चिन्हांची छायाचित्रे असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली पत्रिका बरीच व्हायरल होत आहे.

Narendra Modi's photo printed on the wedding card | तरुणाने लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो, म्हणाला, अहेर आणू नका पण, मत मात्र...

तरुणाने लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो, म्हणाला, अहेर आणू नका पण, मत मात्र...

Next
ठळक मुद्देसध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली लग्न पत्रिका बरीच व्हायरल होत आहे. या पत्रिकेच्या माध्यमातून एका युवकाने लग्नात अहेर आणला नाही तरी चालेल, पण पुढच्या निवडणुकीत मत मात्र मोदींनाच द्या, असा संदेश दिला आहेलग्न पत्रिकेवर मोदींचा फोटो छापणाऱ्या तरुणाचे नाव प्रवीण कुमार असून, तो कर्नाटकमधील मंगळुरूजवळील उल्लाल येथील राहणारा आहे

नवी दिल्ली - लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर सामान्यपणे देवदेवतांची, शुभ चिन्हांची छायाचित्रे असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली लग्न पत्रिका बरीच व्हायरल होत आहे. मोदींचे छायाचित्र असलेल्या या पत्रिकेच्या माध्यमातून एका युवकाने लग्नात अहेर आणला नाही तरी चालेल, पण पुढच्या निवडणुकीत मत मात्र मोदींनाच द्या, असा संदेश दिला आहे. 

लग्न पत्रिकेवर मोदींचा फोटो छापणाऱ्या तरुणाचे नाव प्रवीण कुमार असून, तो कर्नाटकमधील मंगळुरूजवळील उल्लाल येथील राहणारा आहे. तो पेशाने एसी मेकॅनिक असून, तो कुवेत येथे कामाला आहे.  प्रवीण कुमार याने आपल्या विवाहाची पत्रिका मोदीमय बनवली आहे. या पत्रिकेवर त्याने मोदींच्या छायाचित्राबरोबरच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहितीही दिली आहे. 


प्रवीणचा विवाह डिसेंबर महिन्यात होणार आहे. दरम्यान, त्याने विवाहावेळी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी अहेर आणि भेटवस्तू आणण्याऐवजी पुढच्या निवडणुकीत मोदींना मत देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती देताना प्रवीण कुमार म्हणाला, ''नरेंद्र मोदींनी देशाला परदेशामध्ये ओळख मिळवून दिली आहे. ते आमच्यासाठी स्वाभिमानाचा विषय आहे. म्हणूनच मी माझ्या विवाह पत्रिकेवर जे काही लिहिले आहे ते मनापासून लिहिले आहे,''असे प्रवीणने सांगितले.  

Web Title: Narendra Modi's photo printed on the wedding card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.