नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, राहूल गांधींची वाढली, पाहणीचा कौल

By admin | Published: February 20, 2016 09:26 AM2016-02-20T09:26:32+5:302016-02-20T09:31:23+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही भारतातील सगळ्यात लोकप्रिय नेते असले तरी त्यांची लोकप्रियता एका वर्षापूर्वीच्या तुलनेत किंचितशी घटल्याचे व या कालावधीत राहूल गांधींची लोकप्रियता वाढल्याचे समोर येत आहे.

Narendra Modi's popularity decreased, Rahul Gandhi grew, and surveyed | नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, राहूल गांधींची वाढली, पाहणीचा कौल

नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, राहूल गांधींची वाढली, पाहणीचा कौल

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही भारतातील सगळ्यात लोकप्रिय नेते असले तरी त्यांची लोकप्रियता एका वर्षापूर्वीच्या तुलनेत किंचितशी घटल्याचे व या कालावधीत राहूल गांधींची लोकप्रियता वाढल्याचे समोर येत आहे.
इंडिया टुडे व कार्वी इनसाईट्सनी केलेल्या पाहणीमध्ये नरेंद्र मोदींना 58 टक्के सहभागींनी पाठिंबा दर्शवला आहे, जे प्रमाण आधी 61 टक्के होते. तर राहूल गांधींची लोकप्रियता 8 टक्क्यांवरून वाढून तब्बल 22 टक्के झाली आहे.
या पाहणीमध्ये आढळलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे:
 
- 53 टक्के लोकांना वाटतं की मोदींच्या विदेश दौ-यांचा देशाला फायदा झाला आहे, तर 27 टक्के म्हणतात काही उपयोग झाला नाही.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितिश कुमार, सोनिया गांधी किंवा अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत राहूल गांधीच नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतात असं लोकांचं मत आहे.
- उच्चवर्णीयांमधील 54 टक्क्यांनी मोदींना पसंती दिली आहे, तर मागासवर्गीयांमधील केवळ 33 टक्क्यांनी मोदींच्या बाजुने कौल दिला आहे.
- राहूल गांधींना अवघ्या 20 टक्के हिंदूंनी तर 38 टक्के मुस्लीमांनी पाठिंबा दर्शवला आहे.
- संसदेचं कामकाज ठप्प होण्यासाठी 35 टक्के लोकांनी UPA ला जबाबदार धरलं आहे तर, अवघ्या 19 टक्के लोकांनी यासाठी NDA ला जबाबदार धरलं आहे.
- आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान यावर लोकांचा कौल इंदिरा गांधी असा आहे. मोदींचे गुण यामध्येही 30 टक्क्यांवरून 14 टक्के इतके घसरले आहेत.
- जर आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA जिंकेल असं कौल सांगतो, परंतु त्यांच्या जागांमध्ये घट होऊन ती 286 इतकी कमी झाली आहे.
- या पाहणीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 40 टक्केंना असहिष्णूता वाढल्याचे वाटत आहे.

Web Title: Narendra Modi's popularity decreased, Rahul Gandhi grew, and surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.