रयतेचा राजा, जाणता राजा... नरेंद्र मोदींचा शिवरायांना मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:23 AM2019-02-19T11:23:51+5:302019-02-19T11:24:26+5:30

स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.

Narendra Modi's prayers to Shivaji Maharaj | रयतेचा राजा, जाणता राजा... नरेंद्र मोदींचा शिवरायांना मानाचा मुजरा

रयतेचा राजा, जाणता राजा... नरेंद्र मोदींचा शिवरायांना मानाचा मुजरा

googlenewsNext

नवी दिल्ली- स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यासंदर्भात मोदींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मोदींनी शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व बहुआयामी होतं. त्यांनी सुशासन आणि प्रशासन एकसंध करून हिंदुस्तानाच्या इतिहासाचा नवा अध्याय लिहिला. आणि स्वतःची योग्यता आणि क्षमतेच्या आधारावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. संघर्षमय जीवन असतानाही त्यांनी असाध्य असं कार्य साध्य करून दाखवलं. त्याचं व्यक्तित्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे नेहमी सत्य आणि न्यायासाठी लढत राहिले. देशभक्ती त्यांच्यात भिनलेली होती. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत, असंही मोदींनी लिहिलं आहे. मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या हवाला देत शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ‘प्रभू रामांनी लहानसहान लोकांना, वानरांना एकत्रित करून सेना बनवली आणि युद्धात विजय मिळवला, तशाच प्रकारे शिवाजी महाराजांची संघटन कौशल्याच्या जोरावर शेतकरी आणि मावळ्यांना एकत्र करून युद्धासाठी सज्ज केले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज एक फार हुशार सैन्य रणनीतिकार होते. ते पहिले भारतीय शासकांमध्ये पहिले असे शासक होते, ज्यांना नौसेनेचं महत्त्व चांगलंच कळालं होतं. त्यासाठीच त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांमध्ये नौसेना स्थापन केली होती. रत्नागिरीमध्ये त्यांनी जहाजांची डागडुजी करण्यासाठी किल्ल्याची निर्मिती केली होती. तसेच त्यांनी सैन्याचं महत्व ओळखून सैन्य 2 हजारांहून वाढवून 10 हजार केलं होतं. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. वयाच्या16व्या वर्षी तोरणा सर करून ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.

Web Title: Narendra Modi's prayers to Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.