जयंतीच्या आडून ‘नरेंद्र’ राज्यसभेसाठी दक्ष!

By admin | Published: April 16, 2015 11:56 PM2015-04-16T23:56:56+5:302015-04-16T23:56:56+5:30

अनेक वर्षे काँग्रेसशी संधान असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपुआची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलगी वाढविली आहे.

Narendra is 'Rajya Sabha' after Jayanti! | जयंतीच्या आडून ‘नरेंद्र’ राज्यसभेसाठी दक्ष!

जयंतीच्या आडून ‘नरेंद्र’ राज्यसभेसाठी दक्ष!

Next

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
अनेक वर्षे काँग्रेसशी संधान असलेले अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपुआची सत्ता जाताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलगी वाढविली आहे. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्यत्व मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंतीच्या निमित्ताने त्यांची धडपड असल्याचे भाजपतील जाणकार सांगतात.
नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे डॉ. अशोक गांगुली, पुढच्या वर्षीच्या मार्चमध्ये ख्यातनाम कवी जावेद अख्तर व त्याच महिन्यात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत पूर्ण होत आहे. डॉ. मुणगेकर यांच्या जागी जाण्यास डॉ. जाधव उत्सुक आहेत. घटनेच्या कलम ८० नुसार विविध क्षेत्रातील १२ जणांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, पंतप्रधान त्या नावांची शिफारस करतात.
या पार्श्वभूमीवर संघ व भाजप यांच्यात समन्वय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क अशी जबाबदारी असलेले संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी तसेच सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल यांच्याशी जाधव यांनी सूत जमविले आहे. या तिघांशी संबंधित सूत्राने सांगितले की, दोन वर्षांपासून डॉ. जाधव संघाकडे ओढले गेले. मुंबईतील एका कार्यक्रमात ते भैयाजी जोशींसोबतही होते. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जाधव यांनी, ‘देशाला लांबपल्ल्याची अर्थ निती देणारा अर्थ संकल्प,’ या शब्दात कौतुक केल्याने ते काँग्रेसच्या डोळ््यात आले. तर त्याच्या आधारे जाधव यांचे नाव अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या गुडबूकमध्ये गेले. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संघाला दलितांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांसाठी डॉ. जाधव यांच्यासारखा जाणकार आपल्या कामी येईल, असे ठरवून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले.



डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बॅकेचे आर्थिक सल्लागार व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू असले तरी त्यांच्यावर ते काँग्रेस गोटातील असल्याचा शिक्का आहे.
मागील दीड दशक काँग्रेससोबत एवढेच नव्हें तर पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या माध्यमातून नियोजन आयोग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर त्यांची वर्णी लावली होती. लोकसभा निवडणुकीत लातूरची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते.

Web Title: Narendra is 'Rajya Sabha' after Jayanti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.