नरखेड सिद्धेश्वर यात्रेस शनिवारपासून प्रारंभ
By admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:54+5:302016-04-25T00:27:54+5:30
नरखेड :
Next
न खेड : मोहोळ तालुक्यातील नरखेडचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेस 30 एप्रिलपासून प्रारंभ होत आह़े यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े यानिमित्त तीन कोटी रामनाम जपचा संकल्प करण्यात आला असून, 24 एप्रिलपासून मंदिरात रोज सकाळी 8 ते 10 आणि सायं़ 5 ते 7 या वेळेत रामनाम जप सुरू आह़े या रामनाम जप यज्ञात सहभागी होणार्या भाविकांना चंद्रशेखर भडंगे, विठ्ठल नरुळे, दत्तात्रय पवार, दिलीप मोटे, जालिंदर मोटे, सीमाताई मोटे, जयवंत पाटील, रमाकांत पवार, हणमंत झाडे, चंद्रकांत मोटे, भास्कर मोटे, बापू नरवडे, दत्तात्रय सोनार, भास्कर मोटे, अरुण नरखेडकर, लिंबू यादव, राणी भोईटे यांच्या वतीने अन्नदान करण्यात येत आह़े 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता र्शींची मिरवणूक, 1 मे रोजी पहाटे र्शींस अभिषेक, सायं़ 5 वाजता काठीची मिरवणूक, रात्री 8 वाजता पालखी मिरवणूक व शोभेचे दारूकाम आणि रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होईल़ 2 मे रोजी सकाळी 8 वाजता यात्रेकरुंसाठी झुणका भाकर सोय केली आह़े दिवसभर धनगरी ओव्या व भेदी गाणी, दुपारी 3 वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्या होतील़ सायंकाळी 6 वाजता बैल व रेड्यांच्या टकरी आणि रात्री 9 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आह़े तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आह़े (वार्ताहर)