अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:48 PM2018-08-28T17:48:28+5:302018-08-28T17:58:08+5:30

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केरळमध्ये आलेल्या पुराचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो पुराच्या आधीचा आहे, तर एक पुरानंतरचा आहे.

nasa released two before and after photos of the kerala floods | अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो...

अंतराळातून कसे दिसते पूर प्रलयानंतरचे केरळ?; नासाने शेअर केले फोटो...

Next

तिरुवनंतपुरम : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केरळमध्ये आलेल्या पुराचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो पुराच्या आधीचा आहे, तर एक पुरानंतरचा आहे. दोन्ही फोटो पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे किती मोठे नुकसान झाले आहे. नासाने केरळचे दोन फोटो टिपले आहेत, त्यामधील एक 6 फेब्रुवारीला आणि एक 22 ऑगस्टला टिपलेला आहे. 

नासाने ट्विटरवर म्हटले आहे की, केरळमध्ये अनेक गावे मुसळधार पावसामुळे आणि ऑगस्टमध्ये धरणातून पाणी सोडल्यामुळे प्रलयकारी पुराचा सामना करत आहेत. 



 

6 फेब्रुवारीला टिपलेला फोटा...

केरळमध्ये आलेल्या पुरामळे आतापर्यंत 474 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक जिल्ह्यांमध्ये दोन हजार शिबिरे सुरू असून, त्यात तीन लाखांहून अधिक लोक राहत आहेत. राज्यातील अलप्पुझा, एर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, काही लोक शिबिरातून आपल्या घरी परतत आहेत. मात्र, अद्याप शिबिर काही दिवस सुरुच राहणार आहेत. 

22 ऑगस्टला टिपलेला फोटा...

केरळच्या मदतीसाठी 'गुगल'ची धाव
केरळच्या पुनर्वसनासाठी गुगल कंपनी सात कोटी रुपयांची मदत करणार आहे. गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले की, केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी Google.org आणि Googlers मिळून सात कोटी रुपयांचा निधी देणार आहे. गुगल क्राइसिस रिस्पॉन्स टीमने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उपाय योजले आहेत. 

‘अॅपल’ आणि बिल गेट्सने केली केरळच्या पूरग्रस्तांना मदत
केरळच्या पूरग्रस्तांना जगभरातील लोकांनी मदतीचा हात दिला आहे. अॅपलने ही केरळच्या पूरग्रस्तांना 7 कोटींची मदत देण्याचे जाहीर केले आहे. घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हा निधी देण्यात येत असल्याचे अॅपलने सांगितले आहे. आर्थिक मदतीसोबतच अॅपलने आपले होम पेज, अॅपस्टोअर, आयट्यून स्टोअर याठिकाणी केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ग्राहक 5, 10, 25, 50, 100 आणि 200 डॉलरची मदत करु शकतात. तसेच याआधी बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळच्या पूरग्रस्तांना 4 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: nasa released two before and after photos of the kerala floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.