नासाची पुढील वर्षी 'सूर्य'भरारी
By admin | Published: February 28, 2017 09:11 AM2017-02-28T09:11:33+5:302017-02-28T09:26:04+5:30
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आता सूर्यावर जाण्याचा प्रयत्न करणार असून पुढील वर्षी रोबोटिक यान पाठवण्याची तयारी करत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 28 - अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आता सूर्यावर जाण्याचा प्रयत्न करणार असून पुढील वर्षी रोबोटिक यान पाठवण्याची तयारी करत आहे. पृथ्वीपासून तब्बल 149 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असणा-या सूर्यावर जाण्यासाठी नासा सोलार प्रोब प्लस मिशन लाँच करणार आहे. सूर्यावरील हवामानाची पाहणी करण्यासाठी तब्बल 60 दशलक्ष किलोमीटरपर्यंत हे यान पाठवण्यात येणार आहे. मनुष्याने आजपर्यंत चंद्र, मंगळावर पाऊल ठेवत कल्पनेच्या पलीकडील जग दाखवलं आहे. 'सूर्यासाठी पाठवण्यात येणारी ही आमची पहिलीच मोहीम असेल', असं नासामधील संशोधक एरिक ख्रिश्चिएन यांनी सांगितलं आहे.
'आम्ही सूर्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाही, मात्र इतक्या जवळ जाऊ की मुख्य तीन प्रश्नांची उत्तरं मिळतील', असं एरिक ख्रिश्चिएन बोलले आहेत. या मोहीमेमुळे एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की सूर्याचा पृष्ठभाग हवामानाइतका तापलेला का नसतो?. नासाने दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान 5500 डिग्री सेल्सिअस असून हवामानातील तापमान 20 लाख डिग्री सेल्सिअस इतकं आहे. त्याचप्रमाणे हवेला नेमकी गती मिळते कशी हेदेखील वैज्ञानिकांना पाहायचे आहे.
तसंच या मोहीमेमुळे एका मुख्य गोष्टीचा उलगडा होईल तो म्हणजे, 'सूर्य का अनेकदा आपल्याहून अधिक ऊर्जेच्या कणांचे उत्सर्जन करतो ज्यामुळे अंतराळवीर आणि अंतराळयानांना धोका निर्माण होतो'.