"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:08 IST2024-01-19T17:07:42+5:302024-01-19T17:08:23+5:30
अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठरू शकते...

"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचून 5 महिने झाले आहेत. यानंतरही भारताचा अंतराळासंदर्भातील अभ्यास सुरूच आहे. यातच, आता चांद्रावर NASA अर्थात नॅशनल एअरोनॉटिक्स स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या एका यानाने विक्रम लँडरसोबत संपर्क साधल्याचे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे, अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठरू शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, NASA ने म्हटले आहे की, चक्कर मारणाऱ्या अमेरिक स्पेस एजन्सीच्या यानाने विक्रम लँडरच्या दिशेने एक लेझर बीम चालवली. जी रिफ्लेक्ट होऊन परत आली. संस्थेचे म्हणणे आहे की, एखाद्या गोष्टीकडे, लेझर पल्स पाठविले जाते आणि ते परत येण्यासाठी किती वेळ लागला हे तपासले जाते. याच पद्दतीचा वापर करून पृथ्वी भोवती प्रदक्षिणा मारणाऱ्या सॅटेलाइट्सच्या ठिकानांचा शोध घेतला जातो.
नासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'NASA च्या LRO (लूनर रिकॉनेसेन्स ऑर्बिटर)ने आपले लेझर अल्टीमीटर इंस्ट्रूमेन्ट विक्रमच्या दिशेने चालवले. LRO ने लँडरकडे लेझर पल्स चालविले, तेव्हा चंद्र दक्षिण ध्रुव प्रदेशात मँजिनस क्रेटर जवळ LRO पासून 62 मैल अथवा 100 किमी अंतरावर होते. पुढे म्हणण्यात आले आहे की, रिफ्लेक्शन जेव्हा परत आले, तेव्हा आपली टक्निक कामी आल्याचे NASA च्या वैज्ञानिकांच्या लक्षात आले.