आयुक्त बोर्डेंची तडकाफडकी बदली महापालिका क्षेत्रात खळबळ : नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे येणार
By admin | Published: July 3, 2016 12:32 AM2016-07-03T00:32:46+5:302016-07-03T00:32:46+5:30
जळगाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत. प्रारंभापासून जळगावसाठी जीवन सोनवणे यांच्याच नावाची चर्चा होती मात्र किशोर बोर्डे यांची वर्णी लागली होती.
Next
ज गाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत. प्रारंभापासून जळगावसाठी जीवन सोनवणे यांच्याच नावाची चर्चा होती मात्र किशोर बोर्डे यांची वर्णी लागली होती. आयुक्त संजय कापडणीस यांची गेल्या १६ जून रोजी बदली होऊन त्यांच्या जागी मालेगाव येथे आयुक्त म्हणून काम केलेले परंतु महिनाभरापूर्वीच तेथे नवीन आयुक्त आल्याने कार्यभार नसलेले किशोर बोर्डे यांची जळगाव येथे बदली झाली होती. १७ जून रोजी बोर्डे यांनी जळगावी येऊन मनपा आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता.नाशिकला झाली बदलीकिशोर बोर्डे यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात येत असल्याचे आदेश नगर विकास विभागाचे उप सचिव जे.एन. पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या जागी नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची बदली करण्यात येत असल्याचेही या आदेशात नमूद आहे. सोनवणे सोमवारी येणारनवे आयुक्त जीवन सोनवणे हे सोमवारी येथे रूजू होणार असल्याचे सूत्रांनी सांगिलते. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर बोर्डे हे शनिवारी दुपारीच नाशिकला रवाना झाले. तेदेखील सोमवारी जळगावी सोनवणे यांना कार्यभार सोपविण्यासाठी येणार आहेत. कामकाजात सावध पवित्रा१७ पासून बोर्डे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर प्रारंभापासून त्यांचा पवित्रा हा सावधच होता. त्यांनी काही बैठका घेतल्या मात्र कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाला या १६ दिवसात हात घातला नव्हता. त्यामुळे त्यांचा कामकाजातील पवित्रा पहिल्या दिवसापासून सावधच होता. ---केवळ भेटीगाठी व काही ठिकाणी भेटबोर्डे यांनी एका स्थायी समितीचे कामकाज पाहीले. तसेच अधिकार्यांच्या विविध विषयांवर चर्चा केल्या. महापौर नितीन ला यांच्या समवेत त्यांची शुक्रवारी तब्बल दोन तास बैठक झाली. शहरातील मार्केटच्या प्रलंबित विषयावर या दोहोंची चर्चा झाली. मात्र कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत ते पोहोचले नव्हते. -------