नशिराबाद पाणी टंचाई

By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:27+5:302016-03-11T22:26:27+5:30

नियोजनाअभावी ठणठणाट

Nashirabad water scarcity | नशिराबाद पाणी टंचाई

नशिराबाद पाणी टंचाई

Next
योजनाअभावी ठणठणाट
वाघूरचे पाणी मिळूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे. ८ ते १० दिवसाआड मिळणार्‍या पाण्यामुळे वैतागलो आहे. ग्रामपंचायतीच्या ठिसळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी वणवण आहे. आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे दुर्दैव आहे.
-ज्ञानेश्वर लक्ष्मण जोशी
योजना कागदावरच
गावासाठी अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या मात्र त्या कागदावरच राहिल्या. आम्ही फक्त आश्वासनच ऐकतो मात्र त्याची पूर्तता आजतागायत डोळ्यांनी दिसलेली नाही, त्यामुळे पर्यायाने पाणी द्या नाही तर खुर्ची सोडा, असे म्हणावे लागत आहे.
-जयश्री सुरेश अकोले
भटकंती नशिबालाच
पाणी समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. कायमस्वरुपी पाणी योजना तातडीने कार्यान्वित व्हावी, हीच अपेक्षा
-आशा जनार्दन माळी
लोकप्रनिधीच जबाबदार
पाणीटंचाईला -आजी-माजी पदाधिकारीच जबाबदार आहे. संभाव्य पाणीटंचाईचे नियोजन नसल्यानेच वणवण आहे, ठिकठिकाणी होणारी जलगळती थांबवावी, हीच अपेक्षा
-एम.एस.म्हसकर
सुस्त प्रशासन
वर्षानुवर्षापासूनची पाणी टंचाई आता अंगवळणी पडत आहे मात्र सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. ग्रामस्थांचे हाल थांबवावे, पाणी योजना मार्गी लावावी.
-किशोर पिंगळे

Web Title: Nashirabad water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.