पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

By admin | Published: May 7, 2016 06:37 PM2016-05-07T18:37:43+5:302016-05-07T18:37:43+5:30

नशिराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

Nasirabadkar dry with water! | पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

पाणी मिळूनही नशिराबादकर कोरडेच!

Next
िराबाद- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येेथे एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गावाला सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. टंचाईचा तिढा मिटला असला तरी एमआयडीसीचे पाणी दूषित व पिवळसर, फेसयुक्त येत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांचे माठ कोरडेच आहे. पर्यायाने मिनरल, जारच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.
गावाला कायमस्वरुपी पाणी योजनाच नाही, त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहे. एमआयडीसीचा पिवळसर पाण्याबाबत ओरड होत असली तरी पर्यायाने त्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. यंदा डिसेंबर अखेरपासून पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खोलवर गेल्याने टंचाईची झळ ग्रामस्थाना बसत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वाघूरच्या धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. एमआयडीसीचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीने मंत्रालयापर्यंत धाव घेतली अखेर पाणी मिळाले, पाणी टंचाईची तिव्रता कमी झाली खरी मात्र पिवळसर फेसयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या मुर्दापूर, वाघूर, एमआयडीसी असा एकत्रीत पाणी पुरवठा गावास होत आहे. शुद्ध पाण्यासाठी मिनरल वॉटर, जारचे पाणी सुमारे १० ते ३० रुपयापर्यंत उपलब्ध होत असल्याने अनेकांनी तेच पाणी पिण्यासाठी घेताना दिसत आहे. त्यामुळे माठ कोरडेच असून जारमधले पाणी वापरले जात आहे.
दरम्यान, दरवर्षीच एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून न राहता असलेल्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, नियोजनासाठी आतापासून ठोस पावले उचलण्यात यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Web Title: Nasirabadkar dry with water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.