नसली वाडिया यांचीही टाटा स्टीलमधून हकालपट्टी

By admin | Published: December 23, 2016 01:37 AM2016-12-23T01:37:55+5:302016-12-23T01:37:55+5:30

टाटा स्टीलचे स्वतंत्र संचालक नसली वाडिया यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या विशेष सर्वसाधारण

Nasli Wadia's extradition from Tata Steel | नसली वाडिया यांचीही टाटा स्टीलमधून हकालपट्टी

नसली वाडिया यांचीही टाटा स्टीलमधून हकालपट्टी

Next

नवी दिल्ली : टाटा स्टीलचे स्वतंत्र संचालक नसली वाडिया यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या ९0.८ टक्के भागधारकांनी वाडिया यांच्या हकालपट्टीच्या बाजूने मतदान केल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
नियामकीय दस्तावेजात कंपनीने ही माहिती दिली. कंपनीचे एकूण ९७.१२ कोटी समभाग आहे. त्यापैकी ६२.५४ कोटींच्या वतीने मतदान झाले. हे प्रमाण ६४.४ टक्के इतके आहे. ठरावाच्या बाजूने ५६.७९ कोटी मते समभाग मते पडली. हे प्रमाण ९0.८0 टक्के आहे. ठरावाच्या विरोधात ५.७५ कोटी मते पडली. हे प्रमाण ९.२0 टक्के आहे. या ठरावाच्या मंजुरीसाठी बहुमताची गरज होती. असे असताना प्रचंड बहुमताने तो मंजूर करण्यात आला.
प्रवर्तक आणि प्रवर्तक संस्था यांच्याकडे ३0.४५ कोटी समभाग आहे. त्यापैकी २९.५९ कोटींनी मतदान केले. बिगर-प्रवर्तक भागधारकांपैकी ३२.९५ कोटी भागधारकांच्या वतीने मतदान करण्यात आले. त्यापैकी २७.२0 कोटी मते म्हणजेच ८२.५ टक्के मते ठरावाच्या बाजूने पडली. प्रवर्तकांची मते बाजूला ठेवली तरी ठरावाच्या बाजून तीन चतुर्थांश मते राहतात. हे मोठे बहुमत आहे.
औद्योगिक गुंतवणूकदारांचे ४२.६४ कोटी समभाग आहेत. त्यापैकी ३१.९९ कोटींचे मतदान झाले. त्यापैकी ८२.५ टक्के मते वाडिया यांच्या हकालपट्टीच्या बाजूने पडली. अन्य सर्व प्रवर्गातील समभागधारकांनीही ठरावाच्या बाजूने मतदान केले. (वृत्तसंस्था)
मिस्त्री यांच्या कौटुंबिक कंपन्यांच्या याचिकांवर तातडीचा दिलासा नाही
सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्यांच्या वतीने टाटा सन्सच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोणत्याही प्रकारे हंगामी आदेश निर्गमित करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने नकार दिला आहे.
सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी सायरस इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. आणि स्टर्लिंग कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. टाटा सन्समधील गैरव्यवस्थापन, दडपशाही आणि गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती लवादाला करण्यात आली आहे.
हे प्रकरण बी.एस.व्ही. प्रसाद कुमार (सदस्य-न्यायालयीन) आणि व्ही. नल्लासेनपथी (सदस्य-तांत्रिक) यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले.
दोन्ही याचिकांची सुनावणी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय खंडपीठाने दिला. त्याआधी कोणताही आदेश निर्गमित करण्यास खंडपीठाने नकार दिला. या प्रकरणात सायरस मिस्त्री हे ११ क्रमांकाचे प्रतिवादी आहेत. त्यांना एक आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
टाटा सन्स आणि अन्य प्रतिवादींना १५ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच आदेश लवादाने दिले आहेत. मिस्त्री यांच्या उत्तरावर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर १५ दिवसांनी रिजाइंडर सादर करण्याचे आदेश याचिकाकर्त्या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
च्याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देण्याऐवजी या प्रकरणाची गतीने सुनावणी घेण्यास प्राधान्य देणार असल्याचे लवादाने स्पष्ट केले. त्यानंतर सर्व पक्षांच्या सहमतीनंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. आधी याचिकेच्या वैधतेवर युक्तिवाद करा, त्यानंतर गुणवत्तेचे पाहू, असेही लवादाने पक्षकारांना सांगितले.

Web Title: Nasli Wadia's extradition from Tata Steel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.