नसरिंह राव यांनी केली होती सोनिया गांधींची हेरगिरी, विनय सीतापती यांच्या पुस्तकातून गौप्यस्फोट
By admin | Published: June 25, 2016 09:46 PM2016-06-25T21:46:58+5:302016-06-25T21:49:47+5:30
अयोध्या बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी दिले होते असा गौप्यस्फोट विनय सीतापती यांनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 25 - अयोध्या बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची हेरगिरी करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनीच हेरगिरी करण्याचा आदेश दिला होता, असा धक्कादायक खुलासा विनय सीतापती यांनी आपल्या ‘Half-Lion: How P V Narasimha Rao Transformed India’ या पुस्तकात केला आहे. पुस्तकात दिलेली सर्व माहिती नरसिंह राव यांच्या वैयक्तिक दस्ताऐवजांच्या आधारे दिली असल्याचा दावा लेखक विनय सीतापती यांच्यायांनी केला आहे.
अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सोनिया गांधींची हेरगिरी करण्याचा आदेश दिला होता. नरसिंह राव यांनी आयबीच्या गुप्तहेरांना दिलेल्या या आदेशानंतर सोनिया गांधींच्या 10 जनपथ निवास्थानावर नजर ठेवण्यात आली होती. आपल्याला विरोध करणा-या काँग्रेसच्या नेत्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश नरसिंह राव यांनी सोनिया गांधींच्या घरी तैनात असलेल्या आयबीच्या गुप्तहेरांना दिले होते असाही दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
आयबीने नरसिंह राव यांनी लेखी अहवाल सादर केला होता. यामध्ये अर्जुन सिंह, दिग्विजय सिंह, अजित जोगी, सलामतुल्ला आणि अहमद पटेल यांची नावे देण्यात आली होती. या सर्व नेत्यांनी अयोध्या प्रकरणावरुन पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचं अहवालात म्हटलं होतं असंही पुस्तकात सांगण्यात आलं होतं.
नरसिंह राव यांनी त्यानंतरही 1995 साली आयबीमार्फत सोनिया गांधी यांची हेरिगिरी केली होती. यावेळी आपले आणि सोनिया गांधींचे समर्थक यांची माहिती काढण्यात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आयबीने पुन्हा एकदा अहवाल सादर केला होता असं पुस्तकात सांगण्यात आलं आहे.
नरसिंह राव यांच्या हेरगिरीची माहिती मिळाल्यानंतर सोनिया गांधींनीही पक्षातील एकनिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नरसिंह राव यांच्यावर नजर ठेवली असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.