देशाची वाटचाल अराजकतेकडे; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 11:46 AM2018-05-13T11:46:34+5:302018-05-13T11:46:34+5:30

भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पुन्हा एकदा पक्षावर टीका केली

nation staring at anarchy says BJP MP Savitri Bai Phule | देशाची वाटचाल अराजकतेकडे; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

देशाची वाटचाल अराजकतेकडे; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

Next

लखनऊ: देश अराजकतेकडे चालला आहे, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे अराजक नाही, तर काय आहे?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

मोदी सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमधील खासदार असलेल्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या पक्षावर जोरदार टीका केली. 'कधी म्हटलं जातं की, आम्ही भारताच्या संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. कधी म्हटलं जातं की, आम्ही आरक्षण काढून टाकू. तर कधी, भारताचं संविधान अशाप्रकारे संपवू की ते असून-नसून सारखंच असेल, अशीही विधानं केली जातात. देशाचं संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील,' असं सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं. 

मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन झालेल्या वादातही सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपाचे नेते मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात विधानं करत असताना फुले यांनी जिना यांचं कौतुक केलं होतं. जिना हे महापुरुष होते आणि कायम राहतील, असं त्यांनी म्हटलं होतं. 'स्वातंत्र्य लढ्यात जिना यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल, तिथे त्यांचं छायाचित्र लावायला हवं,' असं त्या म्हणाल्या होत्या. 
 

Web Title: nation staring at anarchy says BJP MP Savitri Bai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.