दिबाकर बॅनर्जी यांच्यासह १० दिग्दर्शकांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत
By admin | Published: October 28, 2015 07:47 PM2015-10-28T19:47:15+5:302015-10-28T19:50:31+5:30
साहित्यिकांकडून साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत करुन देशातील असहिष्णू वातावरणाचा विरोध होत असतानाच आता चित्रपट दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२८ - साहित्यिकांकडून साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत करुन देशातील असहिष्णू वातावरणाचा विरोध होत असतानाच आता चित्रपट दिग्दर्शकांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सध्या असहिष्णू वातावरण असून ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिऴविणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यासह दहा दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत.
यामध्ये दिबाकर बॅनर्जी यांच्यासह आनंद पटवर्धन, लिपिका सिंह, निष्ठा जैन, किर्ती नखवा, हर्ष कुलकर्णी, हरी नायर, परेश कामदार, विक्रांत पवार आणि प्रतीक वत्स यांचा समावेश आहे.