'नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य'चा 'राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2018 नं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 03:32 PM2018-06-26T15:32:35+5:302018-06-26T15:43:45+5:30
सामाजिक न्याय विभाग केंद्र शासन, दिल्ली तर्फे संपूर्ण भारतात समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांचा सन्मान जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मंगळवारी (२६ जून २०१८) पुरस्कृत केले गेले.
नवी दिल्ली - सामाजिक न्याय विभाग केंद्र शासन, दिल्ली तर्फे संपूर्ण भारतात समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांचा सन्मान जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मंगळवारी (२६ जून २०१८) पुरस्कृत केले गेले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५९ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक, ५०० स्वयंसेवक यांच्या अथक प्रयत्नांतून कार्यरत असून व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत समुपदेशन, उपचार केंद्रामध्ये दाखल करुन त्यांना योग्य ते उपचार देऊन सातत्याने त्यांच्याशी संपर्कात राहुन उपचार्थींना व्यसनमुक्त करण्याचे काम करीत समाजातील व्यसनांना हद्दपार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८ ने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले आहे. हा पुरस्कार नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी स्वीकारला. यावेळी राष्ट्रपती यांनी आपण सर्व व्यसनमुक्तीचे ब्रँण्ड अॅम्बेसेडर असल्याचे मनोगत व्यक्त केले.
नशाबंदी मंडळाला मिळालेला हा राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला म्हणजे काम संपलं नाही तर काम आता सुरू झाले असून आता मंडळाची जबाबदारी वाढलेली असून ही जबाबदारी अविरतपणे आम्ही पेलू असा विश्वास व्यक्त करित या पुरस्काराचे श्रेय खऱ्या अर्थाने नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक, हितचिंतक यांचे असल्याचे मत नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी मांडले.