Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:27 PM2022-01-31T22:27:04+5:302022-01-31T22:27:42+5:30

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती.

National Commission for SC orders Mumbai Police to register FIR against Nawab Malik | Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

googlenewsNext

दिल्ली – NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वादाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आता आयोगानं महाराष्ट्र पोलिसांना पुढील ७ दिवसांत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे यांनी आयोगासमोर म्हटलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केलेत. वानखेडे यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये होते. तेव्हा मलिकांच्या जावायाला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. जावई जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी वानखेडेंच्या जाती आणि धर्माबद्दल प्रश्न विचारत संशयाचं वातावरण तयार केले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत असं मलिकांचा आरोप होता. वानखेडेंनी बनावट महार जातीचं प्रमाणपत्र बनवलं. त्याच आधारे त्यांना नोकरी बळकावली असं मलिकांनी म्हटलं होतं.

मलिकांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जात पडताळणी कमिटीनं तपास सुरु केला. तेव्हा वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेत मलिकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मलिक यांनी पत्रकार परिषद, सोशल मीडिया यावरुन वानखेडे कुटुंबीयांविरोधात छळ केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वानखेडेंनी केली होती. मलिकांच्या जावायाला अटक केल्यामुळेच त्यांना अशाप्रकारे खोटे आरोप केले असा दावाही वानखेडेंनी केला होता.

ज्ञानदेव वानखेडेंचीही उच्च न्यायालयात धाव

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात सांगितले होते की, वानखेडे यांच्याविरोधात ते कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाहीत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी बिनशर्त माफीही मागितली होती. पण जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई पोलीस नवाब मलिकांना अटक करणार का याकडे सर्वाचं लक्ष – मोहित कंबोज

समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. एट्रोसिटी प्रकरणी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस कधी मंत्री नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करणार? आणि हा अदखलपात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संविधानाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे.

Web Title: National Commission for SC orders Mumbai Police to register FIR against Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.