काश्मीरमध्ये Editor-in-Chief निघाला दहशतवादी, न्यूज पोर्टलचा संपादक चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:35 PM2022-03-30T13:35:50+5:302022-03-30T13:36:24+5:30

Editor in Chief be a terrorist in Kashmir: पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका संपादकाचा सुरक्षा दलांनी एन्काऊंटर केला आहे.

national editor in chief turned out to be a terrorist in kashmir editor of news portal killed in encounter | काश्मीरमध्ये Editor-in-Chief निघाला दहशतवादी, न्यूज पोर्टलचा संपादक चकमकीत ठार

काश्मीरमध्ये Editor-in-Chief निघाला दहशतवादी, न्यूज पोर्टलचा संपादक चकमकीत ठार

Next

Editor in Chief be a terrorist in Kashmir: पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका संपादकाचा सुरक्षा दलांनी एन्काऊंटर केला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांपैकी एक रईस अहमद भट पूर्वी पत्रकारिता करत होता आणि अनंतनागमधील 'व्हॅली न्यूज सर्व्हिस'चे ऑनलाइन पोर्टल चालवत होता. दहशतवादी घटनांशी संबंधित अहमद भटवर यापूर्वीच दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी रईसचे प्रेस ओळखपत्र जारी केले आहे. हिलाल अह राहा असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून तो बिजबेहारा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो 'सी' कॅटेगरीचा दहशतवादी होता.

खोऱ्यात लपून बसलेत दहशतवादी
श्रीनगरच्या रैनावरी भागात ही चकमक झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. येथे काही दहशतवादी लपले आहेत. ते काहीतरी प्लान करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दोन्ही दहशतवादी अनेक घटनांमध्ये सामील होते. त्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्याही केली होती. 

चकमकीच्या ठिकाणी सापडली अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं 
चकमकीनंतर सुरक्षा दलांना घटनास्थळावरून दारुगोळ्यासह आक्षेपार्ह कागदपत्रं सापडली आहेत. भट हा दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होता. माध्यमांच्या ओळखपत्राचा तो गैरवापर करायचा. सुरक्षा दलाच्या यादीत भटला दहशतवाद्यांच्या 'सी' श्रेणीत ठेवण्यात आले होते. ही चकमक घाटी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त मोहिमेचा भाग होती.

रईस गेल्या वर्षीच दहशतवादी बनला होता
रईस गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि आता तो एका चकमकीत मारला गेला आहे. याच महिन्यात काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ९ विविध चकमकीत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून २ दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. याआधी सोमवारी जम्मूच्या बडगाम परिसरातून लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन सक्रिय दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. बडगाम पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्स ऑपरेशन (RR) च्या ६२ व्या बटालियनने ही कारवाई केली. शोपियान परिसरातून पकडलेल्या या दोन दहशतवाद्यांची ओळख वसीम अहमद गनई आणि इक्बाल अशरफ शेख अशी करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हेगारी साहित्य, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, एक चिनी पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन, १२ पिस्तूल राऊंड, ३२ एके-४७ राऊंड जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: national editor in chief turned out to be a terrorist in kashmir editor of news portal killed in encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.