राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:07 AM2017-09-26T02:07:35+5:302017-09-26T02:07:39+5:30

गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.

National Executive Meeting: BJP's six-point agenda for the development of Nav Bharat | राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

Next

नवी दिल्ली : गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.
येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला. सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचे उद््घाटन केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने समारोप झाला. अरुण जेटली व नितीन गडकरी या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नंतर अधिवेशनात झालेल्या कामकाजाची पत्रकारांना माहिती दिली. बचाव करण्यासाठी माझ्यामागे कोणी नातेवाईक नाहीत, असे सांगून मोदी यांनी सार्वजनिक व सरकारी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार आणि लबाडी करणाºयांची जराही गैर करणार नाही, असे ठणकावून सांगितले. राजकीय ठरावात सरकारने हाती घेतलेल्या समाजोद्धाराच्या अनेक योजनांची तारीफ केली.

भ्रष्टाचाराविरुद्ध तडजोड नाही
भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड करणार नाही. यात जो कोणी सापडेल त्याची खैर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निक्षून सांगितले.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बैठकीबाबत माहिती दिली. भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचारात सापडल्यास कुणाची गय करणार नाही. माझा कोणीही नातेवाईक नाही. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, विरोधक सत्तेवर होते तेव्हा सत्ता त्यांच्यासाठी उपभोगाची वस्तू होती आणि आता त्यांना हे समजत नाही की, विरोधी पक्षात कसे राहायचे आहे. अनेकदा विरोधकांकडून कडवट भाषा वापरली जाते. जर सरकारवर कोणताही स्पष्ट आरोप नाही तर अशा भाषेचा वापर हा पर्याय होऊ शकत नाही.

Web Title: National Executive Meeting: BJP's six-point agenda for the development of Nav Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा