नॅशनल फेडरेशन पार्टीच्या ५० जागांची घोषणा
By admin | Published: September 25, 2014 01:38 AM2014-09-25T01:38:43+5:302014-09-25T01:38:43+5:30
नॅशनल फेडरेशन पार्टीने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ५० जागांची घोषणा केली आहे.
मुंबई : नॅशनल फेडरेशन पार्टीने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ५० जागांची घोषणा केली आहे. तरी उमेदवार म्हणून तरुणांनी संधी देताना पक्षाने केवळ २५ ते ४५ वयोगटातील तरुणांनाच उमेदवारी दिल्याची माहिती पक्षाचे प्रणेते जगदीश माणेक यांनी दिली. राज्यात अन्य ठिकाणी समविचारी पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे माणेक यांनी सांगितले. दरम्यान, पक्षाच्या जाहीरनाम्याची घोषणाही केली. जाहीरनाम्यात पक्षाने अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या पाच मूलभूत गोष्टींना महत्त्व दिल्याचे माणेक यांनी सांगितले. जाहीरनाम्यात नद्या जोड प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)