राष्ट्रीय सरचिटणीस की प्रचार समिती अध्यक्ष? सचिन पायलट यांच्यापुढे दोन प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 12:42 PM2023-06-16T12:42:40+5:302023-06-16T12:42:57+5:30
राहुल गांधी अमेरिकेतून आल्यावर होणार निर्णय
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा काँग्रेसश्रेष्ठी सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस नेतृत्वाने पायलट यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत.
- पहिला प्रस्ताव - संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांना म्हटले आहे की, काँग्रेस नेतृत्व आपल्याला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त करू इच्छित आहेत.
- दुसरा प्रस्ताव - राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी ते प्रचार समितीचे अध्यक्षही होऊ शकतात. परंतु सचिन पायलट यांची इच्छा आहे की, ते राजस्थानच्या राजकारणातच राहू इच्छितात. ते राजस्थान सोडू इच्छित नाहीत. अशा स्थितीत त्यांना काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे की, ते राजस्थानमध्येच राहू इच्छित आहेत, तर प्रचार समितीचे अध्यक्षपद त्यांना दिले जाऊ शकते. सचिन पायलट यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी नुकतेच आपल्या सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते.
१८ जूननंतर अंतिम निर्णय
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हेही विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार समितीचे अध्यक्ष होते. या सर्व प्रस्तावांवर १८ जूननंतर अंतिम निर्णय होईल. तोपर्यंत राहुल गांधी विदेशातून परततील. यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात दीर्घ बैठक झाली होती.