नॅशनल हेरॉल्ड खटला : स्वामींना न्यायालयाचा धक्का

By admin | Published: December 26, 2016 08:51 PM2016-12-26T20:51:11+5:302016-12-26T20:51:11+5:30

नॅशनल हेरॉल्ड खटल्यासंबंधीची भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

National Herald Case: The Court's Push to the Swami | नॅशनल हेरॉल्ड खटला : स्वामींना न्यायालयाचा धक्का

नॅशनल हेरॉल्ड खटला : स्वामींना न्यायालयाचा धक्का

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 -   नॅशनल हेरॉल्ड खटल्यासंबंधीची भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. स्वामी यांनी या प्रकरणातील काही कागदपत्रे मागवण्यासाठी  पतियाळा हाऊस न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. दरम्यान, या निर्णयामुळे  राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिलासा मिळाला आहे. 
सोमवारी या याचिकेवर सुनावणी करताना पतियाळा हाऊस न्यायालयाने ही याचिका फेटाळली.  आता या प्रकणाची सुनावणी दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी नॅशनल हेराँल्डची पितृकंपनी असलेल्या असोसिएट्स जर्नल्सवर फसवणुकीने कब्जा केला असून, म्हणूनच न्यायलयात आपण कागदपत्रांची मागणी केली होती, असे स्वामी यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वामी यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. 

Web Title: National Herald Case: The Court's Push to the Swami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.