नॅशनल हेरॉल्डची वेबसाइट सुरू

By Admin | Published: November 15, 2016 02:04 AM2016-11-15T02:04:21+5:302016-11-15T02:04:21+5:30

द असोसिएटेड जर्नल लिमिटेडने सोमवारी आपली इंग्रजी वेबसाइट (बिटा व्हर्जन) सुरू केली.

National Herald website started | नॅशनल हेरॉल्डची वेबसाइट सुरू

नॅशनल हेरॉल्डची वेबसाइट सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली : द असोसिएटेड जर्नल लिमिटेडने सोमवारी आपली इंग्रजी वेबसाइट (बिटा व्हर्जन) सुरू केली. www.nationalheraldindia.com  अशी ही इंग्रजी वेबसाइट आहे. द असोसिएटेड जर्नल लिमिटेड
ही कंपनी १९३७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केली होती. १४ नोव्हेंबर २०१६ पासून या वेबसाइटचे बिटा व्हर्जन असेल. www.nationalheraldindia.com ही डिजिटल वेबसाइट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तत्त्वाला अनुसरूनच काम सुरू ठेवणार आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील आदर्श मूल्ये पुढे नेण्यासाठी ही बांधिल आहेत. आधुनिक, लोकशाहीवादी, न्यायसंगत, उदारमतवादी, सामंजस्यपूर्ण राष्ट्रनिर्मितीसाठी हे प्रयत्न आहेत. हे सांप्रदायिक संघर्षापासून मुक्त असेल. नेहरू यांनी १९३८ मध्ये द नॅशनल हेरॉल्डची सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकासारखी त्याची भूमिका होती. स्वातंत्र्य संकटात आहे, आपल्या सर्व शक्तिनिशी त्याचे संरक्षण करा, असा संदेश होता. स्वातंत्र्यानंतर हेरॉल्डने हिंदीत ‘नवजीवन’ व उर्दूत ‘कौमी आवाज’हे दैनिक सुरू केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: National Herald website started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.